एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी हत्याकांडाची (Murder Mystery) एक भयंकर घटना समोर आली. आपल्या लग्न झालेल्या बॉयफ्रेन्डची (Boyfriend) ओळख नवऱ्याला नव्यानंच लग्न झालेल्या तरुणीनं आपला भाऊ (Brother) म्हणून करुन दिली. त्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच नवऱ्याचा लग्नानंतरच्या 26 दिवसांत काटा काढलाय. अत्यंत चतुराईनं या हत्याकांडाचा कट रचला गेला होता. रुबिनाचं जितेंद्रवर प्रेम होतं. जितेंद्रही रुबिनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. जितेंद्र लग्नानंतरही रुबिनाला विसरु शकला नव्हत. रुबिनाही लग्न झालेल्या जितेंद्रला सर्वस्व अर्पण करुन बसली होती. पण हिंदू असलेल्या जितेंद्र आणि मुस्लिम रुबिनाचं लग्न घरातल्यांना मान्य नव्हतं. नंतर रुबिनाच्या घरातल्यानं तिचं लग्न जावेदशी लावून दिलं.
जावेदशी लग्न झाल्यानंतर रुबिनानं आपल्या प्रियकरांची ओळख पती जावेदशी करुन दिली. हा माझा भाऊ आहे, असं सांगून रुबिनानं जावेद आणि जितेंद्रही ओळख करुन दिली. तर दोघांनीही मिळून जावेदच्या हत्येचा कट रचला. एखाद्या सिनेमासारखीच ही घटना घडली मध्य प्रदेशतच्या छरपूर जिल्ह्यातमध्ये. 30 सप्टेंबर 2017 रोजी घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाचं गूढ उकल्यानंतर सगळेच थक्क झाले होते.
छतरपूरच्या दौरीया गावात हिंदू मुस्लिम युगुलाची प्रेम कहाणी रक्तरंजित ठरली होती. आपल्याच पतीचा रुबिना काटा काढला. बॉयफ्रेन्डसोबत आयुष्य घालवण्यासाठी रुबिनानं जितेंद्रच्या मदतीनं जावेदचा काटा काढला होता.
प्रेमाला विरोध झाल्यानंतर रुबिनाचं लग्न घरातल्यानं जावेदशी लावून दिलं. जावेदशी लग्न झाल्यानंतर रुबिनानं आपला बॉयफ्रेन्ड जितेंद्रशी नवऱ्याशी ओळख करुन दिली. हा माझा भाऊ आहे, असं सांगून जितेंद्र आणि जावेद यांची दोस्ती करुन दिली. त्यानंतर जितेंद्रच्या सांगण्यावरुन एकदा जावेद ला एका ठिकाणी भेटायला बोलावलं. त्यांनी एकत्र गप्पा मारल्या. मग ते दारू प्यायले.
दारुच्या नशेत असलेल्या जावेदला जितेंद्रनं योग्य वेळ साधून त्याच्या छातीत गोळ्या झाडल्या. त्यानंतर जितेंद्र घटनास्थळवरुन पुन्हा दौरीया गावी निघून आला.
दुसऱ्या दिवशी जावेदचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ पुन्हा जितेंद्र पोहोचला. पहाटे पाच वाजता त्यानं खड्डा खोदला आणि त्यानंतर त्या खड्ड्यात जावेदचा मृतदेह त्यात पुरला. हा सगळा कट रचला होता रुबिनानं.
जावेद चार दिवस घरी नाही आला म्हणून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की हा केवळ एक बेपत्ता झालेल्या इसमाच्या प्रकरणाचा किस्सा आहे. मग नंतर जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य पोलिसांना लक्षात आलं, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली.
पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं रुबिना आणि जितेंद्रचे फोन रेकॉर्ड तपासले. त्यातून पोलिसांचा संशय बळावत गेला. भाऊ सांगितलेला जितेंद्र आणि त्यांचे वाढलेले फोन कॉल रेकॉर्ड पोलिसांसमोरचा गुंता वाढवत होते. फोन रेकॉर्ड आणि नंबरचा माग घेत पोलिस जितेंद्रपर्यंत पोहोचले. जितेंद्रला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस जावेदच्या मृतदेहापर्यंत पोहोचले. त्यानंतर सगळी गुंतागुंत सोडवली गेली. मात्र हा सगळा करताना जितेंद्र अटक करण्यापर्यंत गेलेला काळही फार महत्त्वाचा होता. जावेदच्या हत्येनंतर 55 दिवसांनंतर पोलिसांनी जावेदला अटक केली होती. कारण तोपर्यंत जावेदचा मृतदेहच सापडलेला नव्हता. अखेर जावेदला अटक झाल्यानंतर रुबिनाच या सगळ्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार होती, हे समोर आलं.
पोलिसांनी जावेदला ताब्यात घेतलं. त्यानंतर रुबिनाचा भांडाफोड झाला. रुबिनानं आपल्या प्रेमाची कबुली दिली. हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिलाही अटक करण्यात आली. खरंतर जितेंद्रनं ज्या कारणावरुन जावेदला एका स्थळी भेटायला बोलावलं होतं, ते कारणही चकीत करणारं होतं.
रुबिनाचे एका दुसऱ्या गावातील मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय जितेंद्रनं जावेदच्या मनात भरला होता. या दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी जावेदला जितेंद्रनं एका ठिकाणी बोलवालं होतं. त्यासाठी जावेद जेव्हा आला होता, तेव्हा त्यांनी गप्पा मारल्या. ते एकत्र दारु प्यायले. नंतर योग्य क्षण पाहून जितेंद्रनं जावेदचा काटा काढला. तर दुसरीकडे लग्न झालेला जितेंद्रही रुबिनाच्या प्रेमापोटी आपल्या पत्नीला फसवत होता, हेही समोर आलंय.