एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या (5 People killed in family) करण्यात आली आहे. थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh murder case) घडली. प्रयागराजमध्ये (Prayagaraj) घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. प्रयागराजच्या खेवराजपूर गावात पाच जणांची हत्या करण्यात आली. हे पाचही जण एकाच कुटुंबातील होते. प्राथमिक माहितीनुसार, दगड विटांनी हल्ला करुन निर्दयीपणे पाच जणांचा जीव घेण्यात आला. या हत्याकांडानंतर मारेकऱ्यांनी या कुटुंबीयांचं घरही जाळून टाकलंय. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर प्रयागराजमध्ये खळबळ उडाली असून पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घर पेटवून दिलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. हत्या करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये राजकुमार यादव, त्यांची पत्नी कुसुम, मुलगी मनिषा, सून सविता आणि दोन वर्षांची नात साक्षी यांचा समावेश आहे.
प्रदीप कुमार यादव या इसमानं हत्याकांडी माहिती पोलिसांनी दिलं, असं वृत्त आजतकनं दिलं आहे. प्रदीपने आपल्या भावाची आणि वहिनीची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबातीलच इतर तिघांनाही जीवे मारण्यात आलं. सामूहिक हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला केलेल्या तपासानुसार पोलिसांना हा दरोड्याच्या हेतून झालेला हल्ला असावा, अशी शंका आहे. दरम्यान, एडीजी असलेल्या प्रयागराजच्या प्रेम प्रकाश यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे. लूटमार करण्यासाठी आलेल्यांनी हे हत्याकांड केलं असावं अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी संपूर्ण उलगडा झालेलं नाही. अधिक तपास केला जातो आहे. स्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तपास दाखल झालं होतं.
उत्तर प्रदेश के प्रयागराज में एक ही परिवार के पांच लोगों की निर्मम हत्या किए जाने की खबर अति-दुःखद, निन्दनीय व चिन्ताजनक। सरकार घटना की तह में जाकर दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई सुनिश्चित करे।
— Mayawati (@Mayawati) April 23, 2022
दरम्यान, या कुटुंबातील सूनेवर आणि एका मुलीवर बलात्कार झालेला असण्याची भीती व्यक्त केली आहे. महिलांचे कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले आहेत. स्थानिक ग्रामीण पोलिसांकडून या अनुशंगानं तपास केला जातोय. दरम्यान सात दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. आता या हत्याकांड्या घटनेनं मायावती आणि अखिलेश यादव यांनीही ट्वीट करुन संताप व्यक्त केलाय.
भाजपा 2.0 के राज में ~ यूपी डूबा अपराध में
आज का अपराधनामा pic.twitter.com/VceC9KlsdD
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 23, 2022