नाशिकः नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्या खुनाचे फक्त कौटुंबिक कलह कारण नसून, तब्बल साडेतीन कोटींसाठी त्यांना अतिशय थंड पद्धतीने संपवल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे (Sandeep Waje) हा मुख्य संशयित (suspect) आहे. शिवाय त्याला मदत करणाऱ्या आणखी एका संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले गेले आहे. त्यांचा खून करून मृतदेह जाळला. त्यांच्या मोबाईलमधील माहिती डिलिट केली. मात्र, पोलिसांना मोबाइलमधून माहिती मिळाली असून, त्यातून बरेच सत्य बाहेर आल्याचे समजते. विशेष म्हणजे घटना घडली त्या दिवशी रात्री संदीप आणि त्याच्या साथीदाराचे लोकेशन घटनास्थळावर आढळले आहे.
साडेतीन कोटी कशाचे?
डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय संदीपने काही जमीन विकली होती. त्यातून त्याच्याकडे कोट्यवधी रुपये आले होते. यातले तीन ते साडेतीन कोटी रुपये डॉ. सुवर्णा वाजे यांना द्यावे लागले असते. त्याला हे पैसे त्यांना द्यायचे नव्हते. त्यामुळे संदीपने डॉ. वाजे यांना संपवल्याचे समोर येत आहे.
14 वेळा संभाषण
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून झाला. त्या दिवशी त्यांचे पती संदीप सोबत एकूण 14 वेळा संभाषण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय संदीपविरोधात डॉ. सुवर्णा वाजे यांनी आपल्या क्लिनिमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय ठळकपणे समोर आले आहे. मात्र, यावर डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपने अजूनही कबुलीजबाब दिला नाही. तो पोलिसांसमोर काहीही बोलत नाही. त्यामुळे हे सारे सिद्ध करणे पोलिसांना कठीण जातेय.
‘त्याने’ ही पत्नीचा काटा काढला
डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणात संदीपला त्याचा मावसभाऊ बाळासाहेब म्हस्केने मदत केलीय. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र, तो ही तपासात असहकार्य करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे या म्हस्केवरही त्याच्या पत्नीला ठार केल्याचा आरोप आहे. 1997 मध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी 2000 मध्ये निकाल लागला. म्हस्केला पाच वर्षांचा कारावास झाला. मात्र, उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर होता. त्यानेच संदीपला सहकार्य केल्याचे समोर आले आहे.
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात