रत्नागिरी : हा सत्येचा माज म्हणायचा काय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. रत्नागिरीतल्या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी (journalist murder) त्यांनी हा सवाल केलाय. रिफायनरी (Refinery) विरुद्ध लिहिल्याचा राग, राजकीय माथेफिरुंनी ठार केलं. पत्रकार शशिकांत वारुसे यांना अर्धा किलोमीटर फरफटत ठार केलं. याचा जबाबदार कोण, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी ट्वीट केलंय. हा सत्तेचा माजच म्हणायचं का? रिफायनरीच्या विरोधात लिहितो या रागात माथी भडकलेले काही राजकीय माथेफिरुंनी शशिकांत वारीसे या पत्रकाराला अर्धा किलोमीटर फरफटक नेऊन ठार केलं. याला जबाबदार नेमकं कोण? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली. त्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या पंढरीनाथ आंबेरकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्रकार शशिकांत वारिसे याचा अपघाती संशयास्पद मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयस्पद अपघाती मृत्यू प्रकरणाचे गुढ वाढत चाललंय. या अपघाती मृत्यूमुळे आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केलाय. वारीसे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा मृत्यू यांचा काही संबंध आहे का? या भोवती सारे प्रश्न येवून अडकत आहेत.
कशेळी गावात राहणाऱ्या पत्रकार वारिसे यांच्या घरी शोकाकुल परिस्थिती आहे. आई मुलगा असा परिवार असणाऱ्या वारीसे यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी गावकरी पुढे सरसावलेत. वारीसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीची जोराची धडक बसली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला.
हा सत्तेचा माजच म्हणायचं का..?
रिफायनरच्या विरोधात लिहितो या रागात माथी भडकलेले काही राजकीय माथेफिरुंनी शशिकांत वारीसे या पत्रकाराला अर्धा किलोमीटर फरफटत नेऊन ठार केलं.याला जबाबदार नेमक कोण..? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का? pic.twitter.com/OwAEmbGpQj— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2023
पत्रकार शशिकांत वारिसे अपघाती संशयास्पद मृत्यू झाला. नातेवाईकांच्या मागणीनंतर थार चालक पंढरी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातेवाईकांकडून कठोर कारवाईची मागणी केली. तर, रिफायनरी विरोधक आक्रमक झालेत. शनिवारी रिफायनरी विरोधक मोर्चा काढणार आहेत. बातमी दिल्याच्या रागातून अपघात करण्यात आला का, याचा पोलीस तपास करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.