मालेगाव, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील तरुणांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांना नशामुक्त करण्यासाठी मुस्लिम (Muslim) धार्मिक संघटनेने (Organizations) पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. मालेगावमध्ये वेगवेगळ्या नशेच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे, अनेक कुटुंब उद्धवस्थ झालेले आहेत. याशिवाय अनेक तरुण नशेच्या आहारी जात गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले आहे. हीच बाब ओळखून मालेगाव येथील मुस्लिम धर्मगुरू एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या नशेमुक्त मोहिमेत मालेगाव शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी होणार आहे.
मालेगाव शहरातील गुन्हेगारी आणि नशेखोरीमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने मुस्लिम धर्मगुरू यांनी एकत्र येऊन तरुण पिढीला नशेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नशेखोरी मध्ये कुत्तागोळी, एमडी, गांजा चा उपयोग नशेसाठी सर्रास होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मालेगावसह ग्रामीण भागातील अनेक तरुण नशेसाठी गुन्हेगारी मार्गावर चालत असल्याने त्यांना रोखणे ही काळाची गरज असल्याची मुस्लिम संघटनांनी आयोजित बैठक म्हंटले आहे.
नशेतुन बाहेर काढण्यासाठी सुन्नी दावते इस्लामी ही धार्मिक संघटना मैदानात उतरली असून मुस्लिम धर्मगुरू यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
नशा मुक्त मालेगाव ही मोहीम सुरु केली असून ठिकठिकाणी मोहल्ला सभा घेत जनजागृती करण्यास आता सुरुवात झाली असून तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेत पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी आणि मुस्लिम धर्मगुरू पुढाकार घेत असल्याने अनेक कुटुंब आपल्या मुलांच्या बाबत सतर्क झाले असून याबाबत स्वतःहून पुढे येत माहिती देत आहे.