नाशिकः नातातल्या गोडवा, प्रेम, (Love) बहर केव्हाच आटला आहे. ती आता इतकी टोकाची ताणली गेलीयत की आपण ज्याच्यासोबत अनेक वर्ष काढली त्याच्याबद्दल आपल्याला भूतदया देखील जाणवत नाही. असाच एक प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाडमध्ये घडलाय. या ठिकाणी पत्नीनेच चक्क आपल्या पतीच्या खुनाची सुपारी एका इडली डोसा विक्रेत्याला दिली. प्रियकराच्या साथीने आणि मारेकरऱ्याच्या मदतीने त्याला अक्षरशः छळून छळून संपवले. याप्रकरणी कट रचणारी संशयित पत्नी शोभा सचिन दुसाने, तिचा प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन, संदील स्वामी, अशोक काळे, गोरख नामदेव जगतपा, पिंटू उर्फ बाळासाहेब मारूती मोगरी (रा. निफाड), भंगार व्यावसायिक मुकरम जहीर अहेमद यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आठवड्यापासून या खुनातील संशयितांचा शोध सुरू होता. मात्र, तो घरातीलच निघाल्याने तपास करणारे पोलिसही हादरून गेलेत.
अशी घडली घटना?
सचिन दुसाने आणि शोभा दुसाने हे पती-पत्नी. मात्र, यातल्या सचिनला दारू प्यायची सवय. तो प्रचंड दारू प्यायचा. अनेकदा पत्नीला त्रास द्यायचा. याच त्रासाला कंटाळून पत्नीने पतीवर सूड उगवण्याचा निश्चिय केला. शोभाचे दत्तात्रय महाजनसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्याच मदतीने त्याने पतीचा काटा काढला. त्यासाठी दत्तात्रय महाजनने सराईत गुन्हेगारांना एक लाख रुपयांत सचिन दुसानेच्या खुनाची सुपारी दिली. त्यांनी निफाड येथील राहत्या घरातच 23 जानेवारी रोजी सचिन ठार केले.
सळईने चेहरा चेचला
मारेकऱ्यांनी आधी सचिनचा गळा आवळला. त्यानंतर लोखंडी सळईने त्याला छळून ठार केले. चेहरा इतका विद्रुप केला की, त्याची ओळखही पटत नव्हती. त्यानंतर सचिनच्या डस्टर कारच्या डिक्कीत त्याचा मृतदेह टाकला. सोबत सचिनच्याच दुसऱ्या दोन कार घेत ही गाडी पेठजवळच्या कोटंबी घाटात आणली. या दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो एका झाडाला अडकला. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तपास सुरू केला.
कारचेही तुकडे केले
संशयितांनी सचिनला संपवल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या डस्टर कारचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्याने संशयिताची माहिती दिली. सचिनचा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, संजय गोसावी, प्रभाकर पवार, अंमलदार नितीन मंडलिक आदींच्या पथकाने तपास सुरू प्रकरणाचा छडा लावला.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?