नाशिक : नाशिकचे रहिवासी असलेले आणि धुळ्यात प्रशिक्षण केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षण प्रवीण कदम यांनी आत्महत्या केली होती. मंगळवारी धुळ्यातील प्रशिक्षण केंद्रातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या लिहिलेल्या चिठ्ठीत अपघाती गुन्ह्याच्या तपासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, समोर आलेल्या पोलीस तपासात त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण आणि योग्यरीतीने झाल्याची बाब समोर आली आहे. प्रवीण कदम हे 2005मध्ये खात्यांतर्गंत पदोन्नती मिळाली होती त्यावरून ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. नाशिक शहराच्या हद्दीतील गंगापूर, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कदम कार्यरत होते. चिठ्ठीत ज्या अपघाती गुन्हाचा उल्लेख केला आहे त्यावेळी ते गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
प्रवीण कदम हे मूळचे नाशिकचे असून इंदिरानगर येथे राहणारे असून धुळे येथून त्यांचा मृतदेह नाशिकला आणण्यात आला होता, त्यानंतर मोरवाडीत अंत्यसंस्कार झाले होते.
धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती, या घटणेने पोलीस दलात आणि नाशिकमध्ये खळबळ उडाली होती.
प्रवीण कदम यांची खात्या अंतर्गत कुठलीही चौकशी झालेली नव्हती, त्यात कुणी काही आरोपही केले नव्हते, त्यामुळे कदम यांची हत्या की आत्महत्या अशी चर्चा सुरू झाली आहे.
प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या नाशिकच्या गंगापूर रोड येथील एका अपघाती गुन्ह्याचा तपासाचा उल्लेख केला आहे, त्याचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितलेही जात आहे.
दरम्यान, कदम हे पोलीस निरीक्षक होते, तपास करता आला नाही म्हणून आत्महत्या केली? हे कारण अद्यापही खरं वाटत नाही, त्यामुळे कदम यांच्या आत्महत्येचे गूढ वाढत चाललं आहे.