महाराष्ट्रातील घटना! पुन्हा हिट अँड रन, पोलीस तपासात मोठा ट्विस्ट, सूनेनेच दिलेली सुपारी, नेमकं काय कारण?

| Updated on: Jun 07, 2024 | 6:30 PM

पुण्यातील पोर्षे कार प्रकरणाला काही दिवस झाले नाहीत. अशातच नागपूरमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी तपास केल्यावर सूनेनेच सुपारी दिल्याचा धक्कदायक खुलासा झाला आहे. नेमकं काय कारण जाणून घ्या.

महाराष्ट्रातील घटना! पुन्हा हिट अँड रन, पोलीस तपासात मोठा ट्विस्ट, सूनेनेच दिलेली सुपारी, नेमकं काय कारण?
Follow us on

पुण्यात पोर्षे कार घटना ताजीच असताना नागपूरमध्येही एका वृद्धाला गाडीने उडवलं. या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हे प्रकरण वाटतं तिततं सोप्प नाही, कारण या घटनेमध्ये पुरूषोत्तम पुट्टेवार वय 82 याचा मृत्यू झाला. पुरूषोत्तम या वयोवृद्धाचा अपघातामध्ये नाहीतर त्यांची सुपारी देण्यात आलेली होती. मात्र पोलिसांच्या तपासात ही सुपारी त्यांच्या सूनेने दिली असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रामधील नागपूर येथे ही घटना घडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूरमधील मानेवाडा संकुलातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली होती. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनीही या प्रकरणामध्ये पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. पोलिसांनी घटनेमधील आरोपी ज्यांनी पुट्टेवार यांना धडक दिली त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांना असा केला उलगडा

या घटनेनंतर पुरूषोत्तम पुट्टेवार यांच्या भावाने पोलीस अधिकाऱ्याला हत्येचा संशय असल्याचे सांगितले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता एकामागून एक धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कार चालक नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासादरम्यान दोघांनीही अर्चना पुत्तेवार यांच्याकडून पैसे घेऊन तिच्या सासऱ्याला गाडीने धडक दिल्याचे पोलिसांना सांगितले.

पुरुषोत्तम यांच्या 300 कोटींच्या वडिलोपार्जित संपत्तीवर सून अर्चनाचा डोळा होता. विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आजतकला सांगितले की, हे प्रकरण हायप्रोफाईल आहे. नागपूर गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना अटक करून या सुपारी हत्येचे गूढ उकलतील.