ती तेरा वर्षांची, त्याने इंस्टावर रिक्वेस्ट पाठवली; तिने रेक्वेस्ट स्वीकारून स्वतःचा असा केला घात

| Updated on: Apr 06, 2023 | 4:16 PM

मुलांच्या मोबाईलवर काय चाललं हे लक्षात घ्या. अन्यथा केव्हा वाईट बातमी येईल काही सांगता येत नाही. पालकांना सावध करणारी अशी ही बातमी आहे.

ती तेरा वर्षांची, त्याने इंस्टावर रिक्वेस्ट पाठवली; तिने रेक्वेस्ट स्वीकारून स्वतःचा असा केला घात
रील्स बनवताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us on

नागपूर : सोशल मीडियाचा (Social Media) वापर वाढला. लहान मुलांच्या हातात अभ्यासाच्या नावावर कोरोनात मोबाईल द्यावा लागला. पण, मोबाईल वापराचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मुलं चांगले व्हिडीओ पाहून काहीतरी शिकत आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तरी सावध व्हा. त्यांच्या मोबाईलवर काय चाललं हे लक्षात घ्या. अन्यथा केव्हा वाईट बातमी येईल काही सांगता येत नाही. पालकांना सावध करणारी अशी ही बातमी आहे.

मोबाईल बनली गरजेची वस्तू

ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातल्या एका गावातली. सोनू (नाव बदललेलं) हिने वयाची बारा वर्षे पूर्ण केली. किशोरावस्थेत तिनं जेमतेम पदार्पण आलं. त्यामुळं तिला आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. अशात तिने कोरोनाकाळात मोबाईलचा वापर केला होता. त्यामुळे मोबाईल ही तिच्यासाठी गरजेची वस्तू झाली. घरच्यांनीही तिला मुभा दिली. अभ्यासाचं काहीतरी पाहत असेल. अभ्यासाचे व्हिडीओ कामाचे असतात, असं म्हणून तिचे पालक निश्चिंत झाले.

हे सुद्धा वाचा

सावजाच्या तावडीत सापडली

पण, सोनूला इंस्टाग्रामबद्दल समजले. त्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे तिने आईच्या नावाने इंस्ट्राग्राम अकाउंट ओपन केले. त्यावरून ती इंस्टा फ्रेण्डच्या संपर्कात आली. सोशल मीडियाचा वापर करून काही जण सावज शोधत असतात. अशाच एका सावजाच्या ती तावडीत सापडली.

आईच्या नावाने खोटी आयडी

सोनू इंस्टावर ऑक्टोबर २०२२ पासून नगर येथील अनिल करमाड याच्या संपर्कात आली. त्याने खोटी आयडी तयार केली होती. सुरुवातीला तो तिच्याशी तुझी मावसबहीण असल्याचं सांगून बोलला. पण, तिने स्वतःच्या अंतर्गत भागाचे फोटो त्याच्याशी शेअर केले.

अशी केली बदनामी

तू माझ्याशी बोलली नाही तर मी तुझे अंतर्गत भागातील फोटो फेसबूकवर शेअर करेन म्हणून धमकवू लागला. सोनूच्या मैत्रिणीला नग्न अवस्थेतील फोटो पाठवले. त्यानंतर त्याने तिच्या नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवले. मुलीच्या घरी सगळं कळलं. तिने चूक कबुल केली. तोपर्यंत तिची बदनामी झाली.