नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य सुत्रधार अफसर पाशाच्या चौकशीसाठी NIA ची नागपुरात दाखल झाली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आतंकवादी अफसर पाशाबाबत आज माहिती घेतली. नागपूर पोलिसांकडून प्रकरण एनआयएकडे देण्यासाठी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी अफसर पाशा, जयेश पुजारी यांची एनआयए तपास करणार आहे. कालंच अफसर पाशा याला पोलिसांनी बेळगाववरुन नागपुरात आणलंय.
आज दिवसभर नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी करण्यात आली. अफसर पाशाच्या सांगण्यावरुन जयेश पुजारी याने गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन १०० कोटींची मागणी केली होती.
नितीन गडकरी धमकी प्रकरणातील दुसरा आरोपी आतंकवादी अफसर पाशा याला चार दिवसांचा पीसीआर देण्यात आलाय. नागपूर सेशन कोर्टाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नागपूर पोलीस अफसर पाशा याची चौकशी करणार आहेत.
लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा आहे. अफसर पाशाची एनआयएची टीम चौकशी करण्यासाठी आज दाखल झाली. पहिला आरोपी जयेश पुजारीच्या तपासादरम्यान अफसर पाशाची माहिती पुढे आली होती.
जयेश पुजारी कश्मिरी दहशतवादी अफसर पाशाच्या संपर्कात होता. अफसर पाशा हा ढाका आणि बेंगलूरू येथील बॅाम्बस्फोटाचा आरोपी आहे. UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करणाऱ्या जयेश पुजारीचा अफसर पाशा याने माईंड वॉश केल्याची माहिती आहे.