कॅन्सरने पीडित पतीचा घातकी निर्णय, आधी पत्नीला संपवलं नंतर…, ९ वर्षीय बालिकेचं काय होणार?

| Updated on: Jul 02, 2023 | 8:56 PM

या त्याच्या निर्णयाने मुलगी आता निराधार झाली आहे. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॅन्सरने पीडित पतीचा घातकी निर्णय, आधी पत्नीला संपवलं नंतर..., ९ वर्षीय बालिकेचं काय होणार?
Follow us on

नागपूर : सदर पोलीस हद्दीत राजेश राहत होता. राजेशला घरी पत्नी होती. ९ वर्षांची मुलगी आहे. राजेशला तीन वर्षांपूर्वी जबड्याचा कर्करोग झाला. त्यामुळे तो त्रस्त होता. गेल्या तीन वर्षापासून तो कोणतंही काम करत नव्हता. त्याची पत्नी सोनिया ही कामाला जात होती. राजेशच्या मनात काय आलं कुणास ठावून त्याने घातक निर्णय घेतला. या त्याच्या निर्णयाने मुलगी आता निराधार झाली आहे. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली. कॅन्सर पीडित पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्यापूर्वी त्याने पत्नीची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. सोनिया असं मृतक महिलेचं तर राजेश मंडले असं मृतक पतीचे नाव आहे.

तीन वर्षांपासून जबड्याचा कर्करोग

सोनिया ही मॉईलमध्ये कार्यरत आहे. ती तिच्या पती राजेशसोबत छावणी येथील मॉइलच्या वसाहतीत राहत होती. राजेशला मागील तीन वर्षांपासून जबड्याच्या कॅन्सर झाला होता. त्यापासून तो त्रस्त झाला होता. कुठलाही कामधंदा तो सध्या करत नव्हता.

९ वर्षांच्या बालिकेचा विचार केला नाही

याच आजाराला त्रासलेला राजेशनं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वी राजेशने पत्नी सोनियालाही जीवाशी ठार मारलं. नंतर स्वतः गळफास घेतली. त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकलीचा विचार केला नाही. यात पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर परवते यांनी दिली.

पत्नीची हत्या का केली?

कॅन्सरने त्रस्त असल्याने त्याने आत्महत्या केली, हे जरी असलं तरी त्यानं पत्नीची हत्या का केली ? यामागे नेमकं काय कारण याचा शोध पोलीस घेत आहे. पती-पत्नी तर गेले मात्र त्या 9 वर्षाच्या बलिकेचं काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहे.