अकोला : अकोल्यातील अकोट शहरात नुकताच एक नामकरण सोहळा साजरा झाला. यावेळी पिस्तुल काढून हवेत गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपूर्वी अकोट शहरात अल्पवयीन मुलाजवळ पिस्तुल असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली होती. या दरम्यान, हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शहरात पसरली. तेव्हापासून हा मुलगा फरार झाला होता. अखेर, अकोट पोलिसांच्या गुन्हे पथकाने त्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून एक देशी पिस्टल जप्त करण्यात आली आहे.
बाचाबाची दरम्यान हवेत फायरिंग
या मुलाने नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी देशी पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळत आहे. मात्र, नामकरण सोहळा साजरा करताना इतर मुलांसोबत झालेल्या बाचाबाची दरम्यान त्याने हवेत फायरिंग केली होती. त्यामुळेच हे प्रकरण समोर आले. दुसरीकडे अकोट शहरात आतापर्यंत या मुलाने इतर काही जणांना पिस्तुल विकल्या आहे का? याचा तपासही अकोट पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
यवतमाळमध्ये भरदिवसा गोळीबार, तरुणाचा मृत्यू, हत्येमागील गूढ नेमकं काय?
चाकू आणि दारुच्या बाटलीने वार, मुंबईत भावोजींकडून मेव्हण्याची हत्या
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, गुंगीचे भस्म देऊन लूट, दोन भोंदूबाबांना अटक
(Akola Minor Boy detained for Shooting in the air during ceremony)