जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात आला, मग तिथेच जीव देण्याचं कारण काय?

| Updated on: Sep 28, 2022 | 11:12 AM

रात्री त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, पण त्यांनी रुग्णालयातच जीव दिला! असं करण्यामागचं नेमकं कारण काय होतं?

जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात आला, मग तिथेच जीव देण्याचं कारण काय?
धक्कादायक घटना
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्वप्निल उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati Crime News) उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने आत्महत्या (Amravti Patient Suicide) केली. रुग्णाने रुग्णालयातच गळफास लावून घेतला आणि जीव दिला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं संपूर्ण रुग्णालय प्रशासन हादरुन गेलं. तर रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. ही घटना अमरावतीमधील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये घडली. या रुग्णाने आत्महत्या (Suicide Case) नेमकी का केली? याचं कारण कळू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

सुरेश बारकाजी माकोडे असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव आहे. सुरेश माकोडे यांना रात्री दीड वाजता उपचारासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयातील चादरीने सुरेश माकोडे यांनी गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

जीव वाचवण्यासाठी ज्या रुग्णाला रुग्णालयात आणलं, त्याने रुग्णालयातच का जीव दिला? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. दरम्यान, लटकलेल्या अवस्थेत रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने पोलिसांनाही कळवण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांचा रुग्णालयावर आरोप!

रुग्णाच्या आत्महत्येमुळे माकोडे कुटुंबीयांवर मोठा आघात झालाय. त्यांनी सुरेश यांच्या आत्महत्येला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरलंय. रुग्णालयावरच माकोडे कुटुंबीयांनी गंभीर आरोप केलेत.

डॉक्टरांनी रात्री योग्य उपचार न केल्यामुळे रुग्णाला नैराश्य आलं. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रुग्णाने आत्महत्या केली, असा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

आयसीयूमध्ये असलेला पेशंट जनरल वॉर्डमध्ये पाठवल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. रात्री रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर नातेवाईक गावात गेले होते. रुग्णाच्या वेदानांकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. सकाळी सहा वाजता ही घटना घडल्याची माहिती कळल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, याबाबत रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.

रुग्णांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? घटनास्थळी सुसाईड नोट होती का? रुग्णाला नेमका आजार काय होता? सुरेश यांनी टोकाचं पाऊल का उललं? या अनेक प्रश्नांचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. सुरेश यांच्या आत्महत्येची नोंद पोलिसांनी करुन घेतली असून पुढील तपास केला जातोय.