अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat) शिक्षण व्यवस्थेची किती दयनीय अवस्था आहे, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक (Drunk ZP Teacher Viral Video) चक्क वर्गात दारु पिऊन झोपलाय. शाळेतील विद्यार्थी ऑफ पीरियर मिळला म्हणून मस्ती करत सुटलेत. हे सगळं एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या शिक्षिकाचा व्हिडीओ चर्चेत आलाय. अनेक व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये या व्हिडीओमुळे सवाल उपस्थित केले जात आहेत. हा सगळा प्रकार आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातला. धारमी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ झेडपी शाळेतील शिक्षकांवर कुणाचाच वचक नसल्याचं अधोरेखित करतोय. दारु पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच विचित्र अवस्थेत झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जातेय.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षिकाला कशाचच भान नाहीये. वर्गातील विद्यार्थीही वर्गाबाहेर गेलेत. वर्गातले सरच दारु पिऊन आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळून गेलेत. अशातच एक इसम मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत या शिक्षिकाला जागं करतो. त्याला प्रश्न विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातील हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते.
विद्यार्थ्यांनाही याबाबत विचारणा केली जाते. सकाळी सर दारु पिउनच आले होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. असं पहिल्यांच सरांनी केलं असल्याचंही विद्यार्थ्यी सांगतात. दरम्यान, व्हिडीओ काढणारा व्यक्ती या गुरुजींना फैलावर घेत त्यांना असं वागणं शोभतं का, असे सवाल करताना देखील दिसून आला आहे.
हे आहेत महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी तालुक्यातील एका छोटाशा गावातील झेडपी शिक्षक, गुरुजी शोभतंय का हे तुम्हाला? #MaharashtraNews #Video #Amravati #WATCH pic.twitter.com/6pPtqrJ9NG
— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 20, 2022
दारु पिऊन शाळेच्या वर्गात झोपी गेलेल्या या गुरुजींचं नाव पृथ्वीराज चव्हाण असं आहे. ते धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातील उपसरपंच आणि पालकांच्या निदर्शनास हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी संबंधिक अधिकाऱ्यांकडे या मद्यधुंद शिक्षकाबाबत जाब विचारला आहे. आता चौकशीअंती या शिक्षकावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र मद्यधुंद अवस्थेत शाळेत येण्याची हिंमत या शिक्षकाची कशी झाली, असाही प्रश्न उपस्थित होतो. ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांनाच आता शिस्त लावण्याची गरज असल्याची गरज या घटनेमुळे व्यक्त केली जातेय.