अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील बिरोटी गावात युवक व महिलेमध्ये शेतीच्या धुरावर बैल चारण्याच्या कारणावरून वाद (Argument) झाला. महिलेसोबत युवकाची झटापट झाली. यात शेतीच्या वादातून आरोपीने धुर्यावर महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून महिलेची हत्या केली. ही महिला 40 वर्षे वयाची आहे. महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत शेती बांधावर पडून होता. या प्रकरणी धारणी पोलिसांनी सचिन उर्फ रम्मू दारसींभे ( Sachin Darsimbhe) वय 26 वर्ष याला अटक केली. तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ (Superintendent of Police Avinash Bargal) यांनी दिली.
धारणी तालुक्यातील बिरोटी येथे एका महिलेचं मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी शेतावर गेले. पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार बलात्कार आणि खून असा असल्याचं स्पष्ट झालं. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन दारसींभे या आरोपीने खून केल्याची कबुली दिली. आता आरोपीकडून सविस्तर माहिती घेणे सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शेतातले वाद हा काही नवीन विषय नाही. पावसाळ्यात छोट्या-छोट्या कारणासाठी असे वाद होत असतात. बिरोटीतही असाच वाद झाला. माझ्या शेतात बैल चारू नको. मला गवत लागतं, यावरून हा वाद झाला. युवक व महिला यांची बाचाबाची झाली. असे वाद यापूर्वी झाल्याची माहिती आहे. कालही असाच वाद झाला. या वादात 26 सचिननं 40 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्यानं नंतर दगडानं ठेचून महिलाचा खून केला. त्यानंतर तिला निर्वस्त्र अवस्थेत तसेच सोडून दिले. गावात पळून गेला. महिलेचा मृतदेह दिसताच गावकऱ्यांनी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर संशयावरून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीनं खून केल्याची कबुली दिली.