भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यामधील एका गावात काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वर्गात मधल्या सुट्टीमध्ये जेवण करुन मित्रांसोबत खेळायला गेलेला एक पाचवीतला विद्यार्थी जिवंत (5th STD student drown) परतूच शकला नाही. तलावात बुडून या विद्यार्थ्याचा करुण अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तर त्याच्या सोबतच्या मित्रांना या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने धडकीच भरलीये. ही अत्यंत हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर (Tumsar, Bhandara) तालुक्यातील गावात घडली. मृत्यू झालेल्या पाचवीतील विद्यार्थ्याचं वय अवघ 12 वर्ष होतं. या दुःखद घटनेसह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी धास्तावलेत. तर या मुलाच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. विशेष म्हणजे तलावात बुडून मृत्यू झालेला विद्यार्थी आपल्या मामाकडे खास शिक्षण घेण्यासाठी आला होता. मामाकडेच शिक्षण राहून हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. त्यामुळे या मुलाच्या मामासह त्याच्या आईवडिलांवर झालेला आघात किती मोठा आहे, याची निव्वळ कल्पना केलेली बरी!
खेळण्याचा नादात पाय घसरला आणि तलावात बुडून इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यु झाल्याची ही दुःखद घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हसारा गावात घडली. देवेंद्र अजय बोंद्रे, वय 12 वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे.
हसारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत असलेला देवेंद्र अजय बोंद्रे हा विद्यार्थी दहा वाजता शाळेत गेला होता. शाळेतील मधल्या सुट्टीत जेवून वैगरे करुन आपल्या मित्रांसोबत शाळेलगतच असलेल्या गावातील तलावाकडे दोन तिन मित्रांसह खेळायला गेला. खेळत असताना तलावातील पाळीवरून पाय घसरून तलावात पडल्याने देवेंद्र बुडू लागला. सोबत असलेल्या विद्यार्थांनी लगेच आरडा ओरड करत गावात येऊन सांगितले असता गावाकऱ्यानी घरच्या तलावाकडे धाव घेतली.
पाण्यात बुडत असलेल्या देवेंद्रला बाहेर काढत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. देवेंद्रचा बुडून मृत्यू झालाय हे कळताच सगळ्यांना मोठा धक्का बसला. मृतक देवेंद्र हा मामा रामू हिंगे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. तो मुळचा निलज येथील रहिवासी असून मामाकडे राहून शिक्षण घेत होता. त्यांच्या अशा अकाली निधनाने हसारा गावात हळहळ व्यक्त होत आहे.