गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा : ‘जास्त पगाराची नोकरी देतो’ असं सांगून एकाला कामाची ऑफर (Job Offer) देण्यात आली. पण ती ऑफर तरुणाने नाकारलरी. यामुळे नोकरीची ऑफर देणाऱ्यानं युवकाला मारहाण केलीय. बुलढाणा (Buldana crime News) जिल्ह्यातील खामगाव शहरात ही घटना घडली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
तू माझ्या दुकानात काम करत, मी तुला जास्त पगार देतो, असं तरुणाला संगण्यात आलं होतं. पण तरुणाने नकार दिल्याने दुकान चालकाने तरुणाला मारहाण केलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.
खासगाव शहराच्या मेन रोडवर शिव कलेक्शन दुकानं आहे. या दुकाना आशिष मिंलंद वानखडे हा तरुण नोकरी करतो. या दुकाना शेजारी हाफीज बुराणी यांचंही दुकान आहे. हाफीज यांनी आशिषला जास्त पगाराची नोकरी ऑफर केली होती. पण आशिषने ती ऑफर धुडकावून लावली होती. यामुळे संतापलेल्या हाफिझ बुराणी यांच्यासह अविनाश नावाच्या एका व्यक्तीने आशिषला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये आशिष गंभीर जखमी झाला.
आशिष ज्या दुकानात नोकरी करत होता, त्या दुकानाचे मालक सागर धनोकार यांना हा प्रकरा समजला. यानंतर ते देखील समजवण्यासाठी गेले असताना बुराणी आणि अविनाश यांनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.
मारहाणाचीही ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केलीय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण शिव कलेक्शन दुकानात शिरतात आणि दुकानातमध्ये बसलेल्या एका तरुणाला दमदाटी करताना कैद झालेत. त्यानंतर या तरुणाला मारहाण करण्यास दोघेही सुरुवात करत असल्याचंही दिसून आलंय.
जास्त पगाराची नोकरी ऑफर केली, पण त्याने नकार दिला म्हणून तरुणाला मारहाण, बुलढाण्यातील खामगावात घडलेली घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (VC – गणेश सोलंकी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) pic.twitter.com/duHXeF3wK2
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 8, 2022
याप्रकरणी अखेर पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आलीय. खामगाव पोलिसांनी हाफीज बुराणी आणि अविनाश यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेतलाय. याप्रकरणी पुढील तपास खामगाव पोलिसांकडून केला जातोय. हाफीज बुराणी आणि अविनाश यांच्यावर आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.