25 सप्टेंबरला हल्ला, 2 ऑक्टोबरपर्यंत मृत्यूशी झुंज! कुणी मारलं? हेतू काय?

| Updated on: Oct 06, 2022 | 11:52 AM

बुलढाण्यातील धक्कादायक हत्याकांड! सरकारी कर्मचाऱ्याने काढला सहकारी कर्मचाऱ्याचा काटा, हत्येमागचं नेमकं कारण काय?

25 सप्टेंबरला हल्ला, 2 ऑक्टोबरपर्यंत मृत्यूशी झुंज! कुणी मारलं? हेतू काय?
हत्येचं कारण काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा : सरकारी नोकरीत एकत्रच कामावर असलेल्या दोघा मित्रांपैकी एकाची हत्या (Murder Mystery) करण्यात आलीय. या हत्याप्रकरणी मित्रावरच संशय घेण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. बुलढाणा पोलीस (Buldana Police) या हत्याकांडप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 25 सप्टेंबरला झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एक सरकारी कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज 2 ऑक्टोबर रोजी अखेर अपयशी ठरली. त्यानंतर आता हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल करुन घेत संशयिताला अटक (Police Arrest) केली आहे.

सुधाकर इंगोले हे सरकारी नोकरीत होते. त्यांच्यासोबत राजीव लहानेही सोबत होते. दोघेही मित्र. पण सुधाकर यांच्यावर 25 सप्टेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात सुधाकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांच्यावर औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण 2 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुधाकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलत भाऊ गजानन इंगोले यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी सुधाकर यांच्यासोबत बुलढाणा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या राजीव लहाने याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. तसंच राजीव लहाने याला अटकी केलीय.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या 50 वर्षीय सुधाकर इंगोले आणि राजीव लहाने हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीस होते. अनेक वर्षांपासून सोबत असल्याने दोघांत मैत्रीही होती. मृतक सुधाकर इंगोले हे सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात साहाय्यक अधिक्षक पदावर कार्यरत होते, अनेकवेळा हे दोघेही सोबत जेवायला जात होते.

दरम्यान 25 सप्टेंबर रोजी धाड नाक्यावर सुधाकर इंगोले हे जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. प्रथम बुलढाणा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना नेण्यात आलं. नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी याबाबतची माहिती दिलीय.

25 सप्टेंबरच्या संध्याकाळी सुधाकर याला सुंदरखेड येथील राजीव लहाने याने फोन करून बोलावलं होतं. ते घरून निघून गेले होते.राजीव लहाने सोबत त्यांचे मागे एक दोन वेळा भांडणही झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे सुधाकर इंगोले यांना राजीव लहाने याने 25 सप्टेंबरच्या साथीदारांच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आलाय.

सुधाकर यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करण्यात आला होता, असंही फियार्दीत म्हटलंय. सुधाकर यांच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी राजीव लहाने आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांविरुद्ध कलम 307 भा.द.वी. 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता सुधाकर यांचा मृत्यू झाल्यानं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.