Yashomati Thakur | मंत्री यशोमती ठाकूर यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Dec 09, 2021 | 7:49 AM

आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

Yashomati Thakur | मंत्री यशोमती ठाकूर यांना बघून घेण्याची धमकी देणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
यशोमती ठाकूर
Follow us on

अमरावती : अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, अशी तक्रार काँग्रेसच्या दिग्गज नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी पोलिसांना फोनवरुन दिली होती.

काय आहे प्रकरण?

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना काही अभ्यागत त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. ज्यामध्ये ओबीसी महासभेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाढवे हा युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होता.

नेमकं काय घडलं?

मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करत आहेत. आपण सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी प्रवीण गाढवे यांनी आपल्या निवेदनातून केली. मात्र अचानक कुणालाही काही कळण्याच्या आतच प्रवीण आणि पालकमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला.

यशोमती ठाकूर यांचा आरोप काय?

संबंधित तरुणाने आपल्याला ‘बघून घेण्याची’ धमकी दिली, अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरुन दिली. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

आरोपीचं म्हणणं काय?

पोलिसांनी तातडीने धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रवीण गाढवे याला ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित तरुण हा ओबीसी महासभेचा राज्य अध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे. तर याबाबत प्रवीण गाढवे यांची प्रतिक्रिया घेतली असता, तुम्ही राजकारण करत आहात. मलाच पालकमंत्री ठाकूर यांनी धमकी दिला, असा आरोप प्रवीण गाढवे यांनी केला. तर याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाही, अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.

संबंधित बातम्या :

VIDEO | पदर खोचला, हातात लाटणं घेऊन सरसर पोळ्याही लाटल्या, मंत्री यशोमती ठाकूर यांचा अनोखा अंदाज

पोलिसावर हात उगारणे अंगलट, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा