सुरेंद्रकुमार आकोडे, TV9 मराठी, अमरावती : विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा (Farmers Suicide News) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. गेल्या 72 तासांत तब्बल 9 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे विदर्भ (Vidharbha News) हादरलाय. विदर्भातील अमरावती, भंडारा, अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी (Maharashtra Farmers News) आत्महत्येची धग कायम आहे. या तीन जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी डोकेदुखी वाढवणारी अशी आहे.
गेल्या 72 तासांत एकट्या अमरावती जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर भंडारा जिल्ह्यांमध्ये एका शेतकऱ्यांने आत्महत्या कालीय. यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. यवतमाळमधील 5, अमरावतीमधील 3 आणि भंडाऱ्यातील एका शेतकऱ्यासह विदर्भातल गेल्या 72 तासांत तब्बल 9 शेतकऱ्यांनी जीव दिलाय.
अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पावसामुळे झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जातंय.
सततच्या पावसामुळे पूर्व विदर्भात काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं साधारण १०० कोटी रुपयांचं नुकसान. pic.twitter.com/Mb7ojdV89g
— gajanan umate (@gajananumate) October 12, 2022
आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी असल्याचं कळतंय. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे आलेलं आर्थिक संकट कसं दूर करायचं, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय.
आत्महत्या केलेल्या चार शेतकऱ्यांनी गळफास लावून आतलं आयुष्य संपवलं. तर इतर शेतकऱ्यांनी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. अमरावतीलमध्ये तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय.
सतिश मोहोड, वय 34, राहणार खैर, सागर ढोले, वय 33, राहणार मोर्शी, मंगेश सातखेडे, वय 42, राहणार सभादा या तिघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. तरत भंडाऱ्यात भास्कर पारधी, वय 40, राहणार मंधेर, यांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ जनआंदोलन समितीने याबाबतची माहिती दिली आहे.