नागपूर : आधी तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यात पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या नवऱ्याचा समावेश आहे. मोहम्मद अरसलान शेख आणि मोहम्मद सरफराज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील हसनबाग येथे पीडित तरुणी राहते. २०२१ मध्ये पीडितेच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाचे बोलणे सुरु होते. आरोपी मोहम्मद अरसलान याची ओळखी पीडितेशी झाली. एक दिवस आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला.
अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा त्याने पीडितेवर अत्याचार केला. पीडितेच्या जवळच्या नातेवाईकाशी लग्नानंतरही त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. या प्रकरणाची माहिती आरोपीच्या दुसऱ्या नातेवाईकाला लागल्यावर त्यानेही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.
अखेर पीडित तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली. अशी माहिती नंदनवनचे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी दिली.
एकासोबत संबंध असल्याची माहिती दुसऱ्याला झाली. त्यानेही तिला धमकी दिली. भीतीपोटी तीनं अन्याय सहन केला. पण, हा प्रकार सुरूच होता. त्यामुळं कंटाळून पीडितेनं ही घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यांनंतर कुटुंबीयांनी नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.