गडचिरोली : गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सक्रिय असलेल्या बीटेक्स 1 को आणि नाईस 777 नेट या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफार्मवर जुगार खेळणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले. ऑलिम्पिक स्पर्धेसह आयपीएल, फुटबॉल आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात बेटींग करण्यात या टोळीचा समावेश असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याचा अंदाज आहे. पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवरही याद्वारे बेटिंग लावण्यात आल्याचे समोर आले आहे. आष्टी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ते ऑनलाईन जुगाराचे बुकी म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी चंद्रपूर येथील मुख्य वितरक राकेश कोंडावार, रजिक अब्दूल खान आणि महेश अल्लेवार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख वितरक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. सर्व आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
या ऑनलाईन जुगाराची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून तिचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत पसरले आहेत. आयपीएल, फुटबॉलसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांशी हा जुगार संबंधित असून सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही याद्वारे बेटिंग केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसांनी आरोपींकडून 21 लाख 33 हजार रोख रकमेसह दहा मोबाईल जप्त केले आहेत.
पुण्यात सट्टेबाजांना अटक
याआधी, पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळ झालेल्या क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले होते. वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले होते. भारत विरुद्ध इंग्लड सामन्यातील प्रत्येक बॉलवर डोंगरावरुन दुर्बिणीच्या माध्यमातून नजर ठेवली गेली होती. सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना पुण्यात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
(Gadchiroli Bookie arrested for Online betting on Olympics IPL Match)