गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अकोला : पातूर शहरातील भीमनगरात (Bhimnagar in Patur town) राहणाऱ्या एका व्यक्तीने घराच्या मागील अंगणात चक्क गांजाची झाडं ( ganja trees) लावली. त्यानं 15 झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता अंगणात 13 फूट उंच गांजाची 15 झाडे आढळली. पोलिसांनी 21 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.
पातूर शहरातील भीम नगरात एकाने अंगणात गांजाची झाडे लागवड केली. अशी माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकाने शेख कय्युम शेख यांच्या घरी छापा टाकला.
शेख याच्या घराच्या अंगणातील 13 फूट उंचीची गांजाची 15 हिरवीगार झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन 21 किलो आहे. त्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे.
आरोपी शेख कय्युम याने घरात गांजाच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करीत होता. झाडाची पाने वाळवून नंतर तो त्याची ग्राहकांना चोरीछुपे पद्धतीने अवैध विक्री करीत होता.
आरोपी शेख कय्युम शेख करीम याच्याविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. गांजाची झाडे विकणे हा गुन्हा आहे. परंतु, काही लोकं चोरीछुपे या झाडांची लागवड करतात. त्यानंतर त्याची छुपी विक्री केली जाते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाते.
पोलिसांपर्यंत तक्रार न गेल्यास हा गांजाच्या झाडांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू असतो. त्यामुळं चोरट्यांचं फावतं. जास्त नफा मिळत असल्यानं ही चोरीझुपे लागवड केली जाते.