हलाखीच्या परिस्थितीत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं; गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला आणि…

| Updated on: Feb 25, 2023 | 3:17 PM

दुचाकी चोरून नेल्यानंतर नंबर प्लेट बदलवत असे. त्यानंतर ती दुचाकी विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आले. यापूर्वी त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता.

हलाखीच्या परिस्थितीत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं; गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला आणि...
Follow us on

नागपूर : घरात परिस्थिती हालाखीची होती. बीएससीपर्यंत शिक्षण घेतले. लवकर पैसे मिळवण्यासाठी तो दुचाकी चोर बनला. सय्यद गुफरान सय्यद निजाम असं तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याला चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हायचं होत म्हणून त्याने बीएससीपर्यंत शिक्षण घेतलं. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला श्रीमंत व्हायचं होतं. लवकर पैसे मिळवायचे होते म्हणून त्याने वेगळाच मार्ग अवलंबला. बाईक चोर बनला. तहसील पोलिसांनी दुचाकीच्या चोरी प्रकरणात ओळख पटवत गुफरानला अटक केली. तो वर्दळीच्या ठिकाणी स्वताची दुचाकी पार्क करून दुसरी दुचाकी चोरून नेत होता.

नंबर प्लेट बदलवून विक्री करायचा

दुचाकी चोरून नेल्यानंतर नंबर प्लेट बदलवत असे. त्यानंतर ती दुचाकी विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आले. यापूर्वी त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता. पण त्याने 8 दुचाकीच्या चोरल्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अशी माहिती तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्ले यांनी दिली. पैशाच्या हव्यासापोटी हा सुशिक्षित युवक चोर बनला. मात्र आता तो पोलिसांच्या हाती लागल्याने त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.

अशी करायचा चोरी

पार्किंगच्या ठिकाणी जायचा. तिथं आपली गाडी पार्क करायचा. त्यानंतर तिथली दुसरी एखादी गाडी सुरू करून घेऊन जायचा. त्यानंतर त्या गाडीचा नंबर प्लेट बदलवून टाकत असे. नंबर प्लेट चेंज झाल्यानंतर त्या गाडीची विक्री करत असे. अशाप्रकारे त्याने ८ गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली. मला शिकून मोठं व्हायचं होतं. पण,त्यासाठी मी चुकीचा मार्ग अवलंबला. असा आता त्याला पश्चाताप होत आहे. पण, यातून आता काही सुटका होणार नाही. याची जाणीव त्याला झाली.

येथून चोरल्या गाड्या

मेयो, गणेशपेठ, बसस्थानक, इतवारी, गांधी बाग गार्डन, अशा गर्दीच्या ठिकाणी मास्टर कीने गाड्या चोरत असे. दुसऱ्या वाहनाने येऊन स्वतःचे वाहन घेऊन जात असे. डीपी पथकाचे पोलीस शोध घेत होते. पाठलाग करून सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीला अटक केली. गणेशपेठ २, मानकापूर १, तहसील तीन असे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.