सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेमविवाह, आठ महिन्यांची मुलगी, तरीही जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराने पत्नीला का संपवलं?

| Updated on: Jun 30, 2021 | 9:23 PM

चंद्रपुरात एका पतीने रागाच्या भरात पत्नीची निघृणपणे हत्या केली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेम विवाह झाला होता (Husband kills wife on suspicion of love affair).

सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेमविवाह, आठ महिन्यांची मुलगी, तरीही जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराने पत्नीला का संपवलं?
गावाच्या तंटामुक्त समितीने प्रेमविवाह जुळवला, पण तंटानेच घात, मन हेलावून टाकणारी घटना
Follow us on

चंद्रपूर : प्रेम या शब्दाचा अर्थ अद्यापही काही तरुणांना कळालेला दिसत नाही. चंद्रपुरात एका पतीने रागाच्या भरात पत्नीची निघृणपणे हत्या केली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना एक आठ महिन्यांची मुलगी आहे. पण पती पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होत राहायची. यावेळी देखील दोघांमध्ये असंच एक कडाक्याचं भांडण झालं. या भांडणादरम्यान आरोपीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात दाखल झाला (Husband kills wife on suspicion of love affair).

गावाच्या तंटामुक्त समितीने प्रेमविवाह जुळवला

संबंधित घटना ही चंद्रपुरातील चिमुर तालुक्यात घडली आहे. आरोपीचं नाव दीक्षित पाटील असं आहे. तर त्याच्या मृतक पत्नीचं नाव विशाखा असं आहे. दोघांचं सोशल मीडियावर सूत जुळलं होतं. विशाखा ही मुळची गोंदिया जिल्ह्याची आहे. दोघांच्या लग्नाच्या वेळी थोडाश्या अडचणी आल्या होत्या. पण गावाच्या तंटामुक्त समितीने दोघांचा प्रेमविवाह जुळवून दिला होता (Husband kills wife on suspicion of love affair).

दीक्षितच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि संसारचा भनका

लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने दीक्षित आणि विशाखा यांचा सुखाने संसार सुरु होता. दोघांना एक लहान मुलगी देखील होती. पण अचानक दीक्षितच्या डोक्यात विशाखा बद्दल संशयाची पाल चुकचुकली आणि तिथूनच्या त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली.

दीक्षित हा विशाखाला नको ते बोलू लागला. संतापात विशाखा देखील उलट उत्तर देऊ लागली. त्यामुळे दोघांमधील वाद आणखी चिघळला. हा वाद पुढे वाढत गेला. त्यांच्यात सतत वाद सुरु असायचा. याच वादातून दीक्षितने आपल्या पत्नीची हत्या केली.

आरोपीला अटक

पत्नीच्या हत्येनंतर दीक्षित भानावर आला. त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. तो पत्नीच्या हत्येनंतर थेट पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं. आरोपी दीक्षितला कोर्टात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

हेही वाचा : आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्याही मुलीला पळवून आणलं, सासऱ्याने काटा काढला