नागपूर : जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली. 15 वैदू कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव नरसाळा (Narsala) येथे उघडकीस आला. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा येथील धक्कादायक ही घटना घडली. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं (Gram Panchayat) पारीत ठरावं केला. दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव आखण्यात आला. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जळीबुटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाला ना राशन कार्ड आहे ना मुलांना शाळेत शिक्षण घेता येतं. मौदा तालुक्यातील नरसाळ्यातील गटग्रामपंचायत असलेल्या कुंभापूर (Kumbhapur) गावात हा प्रकार घडला.
या 15 कुटुंबातील 75 लोकं गेल्या दहा वर्षांपासून या गावाच राहतात. हे लोकं भटक्या जमातीचे आहेत. त्यांना हाकलण्याचा ठरावचं ग्रामपंचायत सदस्यांनी पारित केलाय. हे संविधानिक मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. हे लोकं जंगलातून जडीबुटी आणतात. त्यांची औषधी तयार करून गावोगावी विकतात. युद्धात जखमी झालेल्यांवर इंग्रज काळात यांचे पूर्वज ही औषधी वापरत होते. या भटक्ता जमातीची शासन दरबारी नोंद नाही. सरकारच्या कोणत्याही सुविधा या भटक्या जमातीला मिळत नाहीत. विशेष म्हणजे यांची मुलंसुद्धा शिक्षणापासून वंचित आहेत. आता ग्रामपंचायतीनं तर येथील वैदू लोकांना हाकलण्याचा डाव आखला आहे. दोन दिवसांत जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. ही गंभीर बाब लक्षात घेत संघर्ष वाहिनीची टीम गावात गेली. दीनानाथ वाघमारे वैदू लोकांच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली. तहसीलदारांचीही भेट घेतली. पण, वाघमारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळं त्यांनी ही व्यथा माध्यमांपुढं मांडली.
तहसीलदारांनी सहा महिन्यांची मुदत या वैदू कुटुंबीयांना दिली आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पण, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न दीनानाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. या वैदू लोकांच्या कुटुंबात सुमारे 25 मुलं ही शाळाबाह्य आहेत. यासंदर्भात वाघमारे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेतील मुख्याध्यापकांनी चर्चा केली. मुलांना शाळेत दाखल करण्यास सांगितलं. पण, गावकरी त्या मुलांना शाळेत टाकलात तर आम्ही आमची मुलं शाळेतून काढू असा दम देतात. त्यामुळं मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांनी वैदूंच्या मुलांची नोंदणी केली असली, तरी गावकऱ्यांच्या रोषापुढं काय होणार, असा सवाल निर्माण झालाय.