नागपूर : आपण किती मोठ्या गुंड किंवा भाई आहो हे दाखविण्याचं एक प्रकारे युवकांमध्ये फॅड सुरू आहे. अशाच नागपुरातील अकबर अंसारी (Akbar Ansari) या युवकाने दोन हातात दोन तलवारी घेऊन त्या फिरवल्या. आपला व्हिडिओ बनविला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. मात्र, व्हायरल केलेला व्हिडिओ सायबर सेलकडे पोहोचला. त्याची सायबर सेलने तपासणी करून गुन्हे शाखा पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखा पोलिसांनी चक्क त्याच्या मुसक्याच आवळल्या. समाजात दहशत माजविणे, भाईगिरीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणं या युवकाला चांगलंच महागात पडलं. त्याच्यावर कुठलेही आधीचे गुन्हे दाखल नाही. मात्र समाजात आपली दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने हा व्हिडीओ टाकल्याचं त्यांनी पोलिसाला सांगितलं. त्याला आता जेलची हवा खावी लागणार हे निश्चित झालं. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज साळुंके (Police Inspector Manoj Salunke) यांनी दिली.
नागपुरात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत एक तरुण दोन हातात दोन तलवारी घेऊन फिरवत आहे. हा स्टंटबाजी करत असल्याचं दिसतंय. एक तलवार वर फिरवतो, तर दुसरी दुसऱ्या हातात आहे. या तलवारी फिरवित असल्यामुळं तो गुन्हेगार ठरला. हा व्हिडीओ सुरुवातीला व्हायरल झाला. त्यानंतर तो सायबर सेलकडं पोहचला. सायबर सेलनं गुन्हे शाखेकडं ही माहिती दिली. तो व्हिडीओ व्हारयल करणारा कोण याची माहिती घेण्यात आली. त्याला अटक करण्यात आली. अकबर अंसारी असं या युवकाचं नाव आहे. भाईगिरी दाखविण्यासाठी व्हिडीओ तयार करून व्हायरल केल्याचं त्याचं म्हणणंय.
भाईगिरी करण्यासाठी हातात तलवारी घेऊन त्या फिरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. असं करणं नागपुरातील एका युवकाला चांगलंच महागात पडलं. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्याच्यावर कारवाई करत अटक केली. अकबर अमलूदिन अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे. युवकांमध्ये अलीकडच्या दिवसात सोशल मीडियाची मोठी क्रेझ वाढली. काही युवक सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करतात. काही मात्र अशाप्रकारे भाईगिरीसाठी वापर करतात. स्वतःच्या अडचणी वाढवून घेतात, हे तेवढेच खरे.