नागपूर : दारुच्या आहारी गेलेल्या मुलाची आई आणि भावाने डोक्यात वीट घालून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. शुभम नानोट असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत शुभमला दारु (Alcohol)चे व्यसन जडले होते. यामुळे तो दररोज आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत असे. तसेच दारुच्या नशेत घरामध्ये तोडफोड करीत असे. त्यामुळे रागाच्या भरात आईने त्याच्या डोक्यात वीट घातली. यामध्ये गंभीर जखमी मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात आई आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Nagpur, a drunken youth was murdered by his mother and brother)
मयत शुभम नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई आणि पत्नीसोबत राहत होता. नुकतेच 23 फेब्रुवारी रोजी त्याने लग्न केले होते. शुभम पूर्ण दारुच्या आहारी गेला होता. रोज दारु पिऊन घरात वाद करायचा. दोन दिवसांपूर्वी तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला आणि आईकडे पत्नीच्या सोनोग्राफीसाठी 5 हजार रुपये मागू लागला. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरात दगडफेक आणि तोडफोड सुरु केली. त्यामुळे रागाच्या भरात आईने त्याच्या डोक्यात वीट घातली. यात तो जखमी झाला. यानंतर आईने मोठ्या मुलाला बोलावून घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्देन अहवालात शुभमच्या डोक्याला इजा आणि गळा आवळण्यात आल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी याबाबत चौकशी करत आई आणि भावाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नंदनवन पोलिस अधिक तपास करीत आहेत.
काही युवक फुटाळा तलाव परिसरात फिरायला गेले तिथे गाडी चालविण्यावरून वाद झाला. मात्र तो तिथेच निपटून दोन युवक बाईकने 10 नंबर पुलियाकडे निघाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने त्यांनी गाडी ढकलत पुढे नेली. तेवढ्यात बुलेटवरून दोन जण आले आणि तुम्ही फुटाळाला गेले होते का विचारलं त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली म्हणून ते तिथून पळाले आणि जवळच असलेल्या मधुशाला वाइन शॉपमध्ये शिरले. मात्र आरोपीने तिथे येऊन त्यांना बाहेर काढलं जोरदार मारहाण केली आणि तोडफोड सुद्धा केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. (In Nagpur, a drunken youth was murdered by his mother and brother)
इतर बातम्या
बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी
आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ