नागपूर : पोलिसांनी बँक आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुलाम असरफीला (Ghulam Asarfi) अटक केली. त्याच्यावर या आधीचे सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत. महत्वाचं म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला होता. बँक ऑफ महाराष्ट्राला कर्ज घेण्यासाठी त्याने बनावट कागद पत्र दिले. त्याने स्वतःला डब्लूसीएलचा कर्मचारी (WCL employee) असल्याचं दाखविलं. त्याने स्वतःची सॅलरी स्लिप सुद्धा बनविली. त्या आधारे त्याने महाराष्ट्र बँकेतून 1 कोटी तर दुसऱ्या बँकेमधून 90 लाख रुपये कर्ज उचललं. एवढंच याचा कारनामा नाही तर तो संघटितपणे गुन्हेगारी करत गाड्यांच्या सीझरचं काम करायचा. ग्रुपच्या माध्यमातून लोकांना गाड्या घ्यायला लावायचा. त्यांच्या इस्टालमेंट थांबवायचा. कमी दरात त्याच गाड्या स्वतः विकत घ्यायचा. मग चढ्या दराने दुसऱ्यांना विकायचा. त्याच्या विरोधात बँकेची तक्रार आली. पोलिसांनी त्याला अटक केली. अशी माहिती डीसीपी गजानन राजमाने (DCP Gajanan Rajmane) यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेला गुलाम असरफी याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. Wcl चा कर्मचारी म्हणून याने डुप्लिकेट कागदपत्र बनवून बँक ऑफ महाराष्ट्रामधून 1 कोटी तर दुसऱ्या बँकेतून 90 लाख रुपयांचे कर्ज घेतले. सोबतच गाड्यांच्या सीझरचं काम संघटितपणे करून लोकांना फसवायचा. सत्ता बदलली की पक्ष बदलायचा अशातला हा आहे. मात्र गुन्हेगारांचा कुठलाही पक्ष किंवा धर्म नसतो. फसवणूक झालेल्यांनी समोर येण्याचं आवाहन पोलिासंनी केलंय.
असरफीने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकारणी असल्यानं त्यानं चालाखी सुरू केली. बँकेतून कर्ज काढण्यासाठी त्यानं बनावट कागदपत्र तयार केले. डब्लूसीएलमध्ये नोकरीला असल्याच्या खोट्या स्पील तयार केल्या. त्या आधारी एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले. दुसऱ्या बँकेतून 90 लाख रुपयांचे कर्ज घेतले. शिवाय तो लोकांना फसवायचा. गृपच्या माध्यमातून लोकांना गाड्या घ्यायला लावायचा. त्यांच्या इन्स्टालमेंट थांबवायचा. कमी दरात स्वतः गाड्या खरेदी करायचा. जास्त दरात दुसऱ्याला विकायचा. पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याचे प्रताप समोर आले. बऱ्याच लोकांना फसविल्याची माहिती आहे. त्यासाठी फसवणूक झालेल्यांनी समोर येण्याची गरज आहे.