Nagpur Murder Update : नागपुरमधील हत्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा, एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचे उघड

| Updated on: Aug 02, 2022 | 4:53 PM

आरोपी बलराम पांडेचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचा पाठलाग करायचा, छेड काढायचा. याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळा बलरामला समजावले होते.

Nagpur Murder Update : नागपुरमधील हत्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा, एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचे उघड
नागपुरमधील हत्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातील नारायण द्विवेदी हत्या (Murder) प्रकरणात पोलिसांनी नवा खुलासा (Revealed) केला आहे. मयत इसमाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपीचे एकर्फी प्रेम असल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. बलराम पांडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नारायण द्विवेदी यांची धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली होती. नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली. त्यामुळे त्यांनी घर बदलले. गिट्टीखदान परिसरात रविवारी सकाळी शहरातील पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळ नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या झाली होती. नारायण यांची हत्या मृतकच्या जुन्या घर मालकाच्या 20 वर्षीय मुलानेच केल्याचे उघड झाले आहे.

मयताच्या अल्पवयीन मुलीवर आरोपीचे प्रेम होते

आरोपी बलराम पांडेचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचा पाठलाग करायचा, छेड काढायचा. याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळा बलरामला समजावले होते. त्यांनी बालरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. बलरामच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबाने पांडे यांचे घर सोडून जाण्याचा निर्धार केला. मात्र घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले. तरी ही तीन दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबीयांनी घर बदलले. याचाच राग आरोपीच्या मनात होता.

धारदार शस्त्राने वार करुन केली होती हत्या

नारायण द्विवेदी रविवारी सकाळी कामावर जाण्यासाठी दुचाकीने घरातून निघाले होते. तेव्हापासून बलराम त्यांचा पाठलाग करत होता. ते गिट्टीखदान परिसरात गुन्हे शाखेच्या जवळून जात असताना बलरामने त्यांना अडवले आणि त्यांच्यासोबत वाद उकरून काढत प्राणघातक हल्ला केला. आरोपीने चाकूने नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरच कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याला गोरेवाडा परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी द्विवेदी कुटुंबियांकडून त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपी छेडछाड करत असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. (It is revealed that the murders in Nagpur were due to one sided love matter)

हे सुद्धा वाचा