नागपूर : नागपूर गुन्हे शाखा (Nagpur Crime Branch) पोलीस एकामागून एक अवैध काम करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आहे. डुप्लिकेट बॉण्ड (Duplicate Bond) बनवून आरोपींना जमानत मिळवून देणाऱ्या टोळीला अटक केली. त्यानंतर आता जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहककडून (Consumer) पैसे घेतले जात होते. हे जुने स्टॅम्प स्टोअर करून ठेवण्यासाठी त्याची नोंदणी करणाऱ्या रजिस्टरमध्ये कोरी जागा सोडली जात होती. ग्राहक आला की मागच्या तारखेच्या जाऊन नोंद करायची. त्यांच्याकडून जास्त पैसे घ्यायचे. या स्टॅम्प पेपरच्या ग्राहक जुन्या तारखेचे व्यवहार आज करत होते. हे स्टॅम्प विकणारी एक टोळी आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
डुप्लिकेट बॉण्ड बनवून आरोपींना जमानत मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यानंतर आता नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला. जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकणाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या. या प्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून जुने स्टॅम्प पेपर हस्तगत केले. जुन्या तारखेच्या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून अनेक गैरकायद्याची काम होतात. त्यासाठी त्याची मागणी असते. ही टोळी याचा फायदा घेत त्यांच्याकडून पैसे उखळत होती. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
नवीन ग्राहकांना स्ट्रम्प पेपर नाहीत, असं सांगितलं. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी दोनशे रुपये घेतले जातात. यासाठी दलाल सक्रिय आहेत. यातला काही नफा हा विक्री करणाऱ्याच्या खिशात जातो. दलाल आणि स्टॅम्प पेपर विक्रेता मिळून हे पैसे कमवितात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. नवख्या माणसाला ठिकठिकाणी फिरविले जाते. स्टॅम्प पेपर तिथं मिळेल, म्हणून सांगितले जाते. पण, प्रत्यक्ष तिथं गेल्यावर कुणीच नसतो. मग, त्रासून ग्राहक पुन्हा दलालाकडं येतो. दुप्पट पैसे देतो. त्यानंतर दलाल स्ट्रम्प पेपर आणून देतो. यात सामान्य माणसांची मोठी लूट केली जाते.