अकोला : घरगुती वादातून झालेल्या मारामारीत तीन जण गंभीर जखमी झाले तर दहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सासर-माहेरच्या मंडळींमध्ये वादावर तोडगा काढताना खटके उडाले. त्यानंतर याचे पर्यावसान दोन गटांतील मारहाणीत झाले. अकोला जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
अमरावती येथील माहेर असलेल्या तरुणीचा विवाह अकोल्याच्या धोत्रा शिंदे येथील एका परिवारात काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र तेव्हापासूनच विवाहितेचा सासरच्या मंडळींसोबत वाद सुरु होता. याच प्रकरणी समजूत घालण्यासाठी अमरावतीवरुन काही मंडळी धोत्रा शिंदे येथे दाखल झाली होती.
तीन जण गंभीर जखमी
समजूत काढताना वाद विकोपाला जाऊन याचे पर्यवसान दोन गटांतील मारहाणीत झाले. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम धोत्रा शिंदे येथे हा प्रकार घडला.
परस्परविरोधी तक्रारी दाखल
धोत्रा शिंदे येथील 45 वर्षीय शेख तालीफ शेख कुदरत, तर 25 वर्षीय शेख मुस्ताक शेख तानीफ आणि अमरावती येथील 18 वर्षीय साजीद खान मोहम्मद खान हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहेत. तर बाकी किरकोळ जखमींवर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात दोन्ही गटांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील विक्रोळीत तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी
एकीकडे, औरंगाबाद येथील एका महिलेने आपल्या पतीला परस्त्रीसोबत फिरताना रंगेहाथ पकल्यानंतर मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंबईत देखील तशीच काहीशी घटना घडली होती. मुंबईच्या विक्रोळी येथील सर्व्हिस रोडवर दोन तरुणींनी मिळून एका तरुणीला बेदम चोप दिल्याचं समोर आलं होतं. माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? अशी विचारणा करत दोघींनी तिला बेदम चोप देण्यास सुरुवात केली होती. ही घटना बुधवारी (11 ऑगस्टला) घडली होती. तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर मुलींच्या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या :
आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी