Akola Crime | मुलगी झाल्याने बायकोला माहेरी पाठवलं, पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचीही धमकी

| Updated on: Dec 12, 2021 | 1:10 PM

अकोला जिल्हातील पातूर येथील पिंजर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेचा विवाह 2012 मध्ये झाला होता. दोन वर्षांनंतर महिलेला मुलगी झाली, तेव्हापासून पतीकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे

Akola Crime | मुलगी झाल्याने बायकोला माहेरी पाठवलं, पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचीही धमकी
अकोल्यात विवाहितेला धमकी
Follow us on

अकोला : एकीकडे महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासाठी सरकार पुढाकार घेत असताना दुसरीकडे, एकविसाव्या शतकातही मुलगी झाली म्हणून अपशकुन मानणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळत आहे. मुलगी झाली म्हणून विवाहितेचा मानसिक छळ करुन तिला पेटवून देण्याची धमकी देण्यात आली, अकोल्यात जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे.

काय आहे प्रकरण?

अकोला जिल्हातील पातूर येथील पिंजर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेचा विवाह 2012 मध्ये झाला होता. दोन वर्षांनंतर महिलेला मुलगी झाली, तेव्हापासून पतीकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे. याचं कारण म्हणजे तिला मुलगी झाली. इतकंच नव्हे, तर त्या महिलेला माहेरी टाकून देण्यात आलं आहे.

पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी

हा संपूर्ण प्रकार न्यायालयात सुरु असून 498 नुसार प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ते प्रकरण मागे घे, यासाठी धमकावून पती गोपाळ वहुरकर याने पीडित महिलेला मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यावरून महिलेने पातूर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी झाली तेव्हापासून पती तिला मानसिक आणि शारीरिक छळ करत असून तिला माहेरी टाकून दिलं आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना आज मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची त्या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे, पण या जगात आजही मुलगी झाली म्हणून अपशकुन मानणारे लोक असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.

संबंधित बातम्या :

‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू