Marathi News Crime Nagpur crime Maharashtra Crime News Amaravati Kandli Village Deputy Sarpanch attacked days after Love Marriage with Sarpanch lady
महिला सरपंचासोबत थाटामाटात प्रेमविवाह, अमरावतीत उपसरपंचावर जीवघेणा हल्ला
19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गावातील महिला सरपंचाशी विवाह केल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला
अमरावतीत उपसरपंचावर जीवघेणा हल्ला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on
अमरावती : उपसरपंचावर जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील सरपंच महिलेसोबत उपसरपंच लग्नबंधनात अडकले होते. महिला सरपंच आणि उपसरपंच यांचा प्रेम विवाह (Love Marriage) झाला होता. या पार्श्वभूमीवर उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या कांडली (Amravati Crime) गावात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उपसरपंच धंडारे यांच्या पाठीवर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. रोहित मरसकोल्हे या आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. सध्या उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र अमरावतीच्या कांडली गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गावातील महिला सरपंचाशी विवाह केल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उपसरपंच गंभीर जखमी
आरोपी रोहित मरसकोल्हे याने हा प्राणघातक हल्ला केला असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्राणघातक हल्ल्यात उपसरपंच गंगा धंडारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अमरावती मधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आरोपीने हल्ला का केला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
शिवजयंतीला थाटामाटात लग्न
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतचे उपसरपंच गंगा धंडारे यांनी 19 फेब्रुवारीला गावातील सरपंच सविता आहाके यांच्या सोबत थाटामाटात लग्न गाठ बांधली होती. गावांतील सरपंच व उपसरपंच यांनी एकत्र येऊन लग्न केल्याने आणि सरपंच-उपसरपंच एकाच कुटुंबात झाल्याने या विवाहाची चर्चा राज्यभर झाली होती.
या विवाहाचे अनेकांनी कौतुक केले होते. अशातच आता लग्नाला केवळ दोन आठवडे उलटले असताना उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास कांडली जुनी वस्ती येथे प्राणघातक हल्ला झाला आहे.