अमरावती : सध्या तरुण पिढीला वेड लागलं आहे, ते सोशल माध्यमावर सेल्फी (Selfie) आणि व्हिडीओ शेअर करण्याचं. या माध्यमांनी काही जणांना स्वतःची ओळख निर्माण करुन दिली, तर काही जणांना या नादापायी आपला जीव गमवावा लागला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील कुष्टा शेत शिवारात अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कुष्टा गावातील शेततळ्यात बुडून (Drown) दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली होती. 13 वर्षीय मुलीसह तरुणाला जीव गमवावा लागला. आता या दुर्घटनेमागील कहाणी उघड झाली आहे. दर रोज शेततळ्यावर व्हिडीओ बनवून मनोरंजन करणाऱ्या दोघांना याच शेततळावर जलसमाधी मिळाली आहे.
कुष्टा शेत शिवारातील शेत तळ्यावर सेल्फी घेत असताना 13 वर्षीय हर्षा वांगे पाण्यात बुडाली. हर्षा बुडत असताना तिला वाचवण्यासाठी 25 वर्षांच्या बाजीलाल कासदेकर याने देखील उडी घेतली. मात्र शेत तळ्यावर पंनी लागली असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही आणि दोघांनाही जीव गमवावा लागला.
पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदन करण्याकरिता पोलिसांच्या मदतीने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दोघांचेही मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
बाजीलाल हा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज बनवण्याचं काम करत होता. “किस्सा नहीं, कहानी बन गई” हा त्याचा व्हिडीओ अखेरचा ठरला आहे.
दर रोज शेततळ्यावर व्हिडीओ बनवून मनोरंजन करणाऱ्या दोघांना याच शेततळावर जलसमाधी मिळाली आहे. त्यामुळे तारुण्यात असलेल्या अनेकांना वेड लागलेल्याना जीवावर बेतेल असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
तुरुंगातच प्रकृती बिघडली, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांचा एकामागून एक मृत्यू
नाल्यात पोहताना दोन विद्यार्थी बुडाले, मित्र पळून गेले, रात्री मृतदेह सापडले
काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू