भंडारा : रानडुक्कर शिकार (boar hunting) प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी (Bhandara Crime) येथे हा प्रकार घडला आहे. रानडुकराची शिकार करुन मांस विक्री करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याचा आरोप आहे. राजाराम गणपत मेश्राम (वय 54 वर्ष, रा. दिघोरी मोठी) असं मयत आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर रानडुकराची शिकार करुन मास विक्री बाबत वन विभागाने गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्या अंतर्गत वन विभागाने आरोपीला सूचना पत्रावर सोडले होते. ही घटना गुरुवारी सकाळच्या वेळी उघडकीस आली होती.
26 मार्च रोजी स्थानिक दिघोरी मोठी जंगल परिसरात राजाराम मेश्राम याला रानडुकराचे मांस विकताना वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. यावेळी वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोपीकडून 20 किलो रानडुकराचे मांस आणि अन्य मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून सूचनापत्रावर सोडले होते.
दरम्यान, मद्याच्या आहारी गेलेल्या आरोपीने घटनेच्या आदल्या रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत गावातील शेत शिवारात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. पुढल्या दिवशी सकाळच् यासुमारास तो मृतावस्थेत आढळून आल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती स्थानिक दिघोरी मोठी पोलिसांना होताच येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी दिघोरी मोठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. रानडुक्कर शिकार प्रकरणाचा तपास या घटनेनंतर मंदावेल असा कयासही व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास, तरुणाची आत्महत्या, नांदेड स्थानकावर धक्कादायक घटना
प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या