भंडाऱ्यातील ज्वेलर्सचे 75 लाखांचे दागिने-रोख लुटणारी टोळी नागपुरात जेरबंद

| Updated on: Aug 18, 2021 | 7:47 AM

नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दागिने लुटणाऱ्या टोळीतील पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी कुख्यात असून यांनी सुरत, गोंदिया, भंडारा, नागपुरात सुद्धा अशाच प्रकारे लूट केली असल्याचे समोर येत आहे.

भंडाऱ्यातील ज्वेलर्सचे 75 लाखांचे दागिने-रोख लुटणारी टोळी नागपुरात जेरबंद
भंडाऱ्यात स्वाती ज्वेलर्सच्या मालकाची लूट
Follow us on

नागपूर : भंडारा जिल्ह्यात 75 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला नागपुरात अटक करण्यात आली आहे. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी 5 जणांना अटक केली. दुकान उघडत असताना ज्वेलर्स मालक बेसावध असल्याचं पाहून दोन बाईकस्वार चोरट्यांनी त्याची दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास केली होती.

नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दागिने लुटणाऱ्या टोळीतील पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी कुख्यात असून यांनी सुरत, गोंदिया, भंडारा, नागपुरात सुद्धा अशाच प्रकारे लूट केली असल्याचे समोर येत आहे. भंडारा शहरातील पेट्रोल पंप ठाणा परिसरात असलेल्या स्वाती ज्वेलर्सच्या मालकावर पाळत ठेवून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरांनी चोरी केली होती.

दुकान उघडताना बेसावध असल्याची संधी

भंडारा शहरालगत असलेल्या जवाहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ठाणा येथे सोमवारी हा प्रकार घडला होता. दुकान उघडत असलेल्या ज्वेलर्स मालकाची दागिने आणि पैसे असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केली होती. यात तब्बल 75 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली होती.

नेमकं काय घडलं?

विनोद भुजाडे यांच्या मालकीचे स्वाती ज्वेलर्स हे ज्वेलरीचे दुकान आहे. भुजाडे यांनी आपलं दुकान उघडत असताना हातातील रोख रक्कम आणि दागिने असलेली बॅग बाजूला ठेवली होती. ते दुकान उघडण्यात व्यस्त होते. यावेळी होंडा हॉर्नेट बाईकने आलेल्या चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याचे पाहत बॅग लंपास केली आणि पळ काढला होता.

चोर नागपूरकडे पळाले

दरम्यान, चोर नागपूरच्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती दुकानदाराने दिली होती. विनोद भुजाडे यांनी जवाहर नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दागिने लुटणाऱ्या टोळीतील पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी कुख्यात असून यांनी सुरत, गोंदिया, भंडारा, नागपुरात सुद्धा अशाच प्रकारे लूट केली असल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास

बॉयफ्रेंडच्या मदतीने टिप, नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडेखोरांना मध्य प्रदेशात अटक

आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट