भंडारा : धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग (Molestation) करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना (Bhandara Crime) घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 363, तसेच पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. राजेश ईश्वर मडावी (वय 19 वर्ष, राहनार बोदरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने आरोपी राजेश अल्पवयीन मुलीला साकोलीवरुन एसटी बसने घेऊन गेला. रात्रीची वेळ असल्याने आणि बसमध्ये वाहक नसल्याचे पाहून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला.
नागपूरला पोहोचल्यानंतर राजेश तिला घेऊन आपल्या नातेवाईकांकडे गेला. मात्र नातेवाईकाला त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याने राजेशला ताबडतोब घरुन निघून जाण्यास सांगितले. नाईलाजाने राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परतला.
दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरु केला तेव्हा बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता विद्यार्थिनी राजेश मडावीसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी बोदरा गाव गाठून अल्पवयीन विद्यार्थिनी आणि राजेश मडावी यांना ताब्यात घेतले. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्या आधारावर पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर कलम भादंवि 376, 363 आणि पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास साकोली पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या :
सिगारेटचे चटके देत कपडे फाडले, पुण्यात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग
महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून ‘पुष्पराज’ला फोडला
व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन महागात पडले; कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा