बुलडाणा : कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देताच ड्रायव्हर गाडी घेऊन पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलडाण्यातीस खामगाव-नांदुरा रोडवर घनश्याम ऑटो सर्व्हिस आमसरी येथील पेट्रोल पंपावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या कार नंबरची तपासणी केली असता तो एका ट्रॅक्टरचा असल्याचे समजले. यामुळे कार सुद्धा चोरीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस या कारचा शोध घेत आहेत.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी संदीप ठाकरे हा ड्युटीवर असताना बुधवारी रात्री मारुती स्विफ्ट कार क्रमांक यूपी 13 ए 2983 ही पेट्रोल पंपावर आली. त्यामध्ये चालक आणि काही व्यक्ती बसलेल्या होत्या.
चालकाने टाकी फुल करण्यास सांगितल्याने गाडीमध्ये 38 लिटर पेट्रोल भरण्यात आले. त्याची किंमत 4201 रुपये इतकी झाली. मात्र कार चालक पैसे न देताच गाडी घेऊन पळून गेला. या संदर्भात जलंब पोलिसांनी कार चालकाविरुद्ध कलम 406 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | टाकी फुल केली, मग सुसाट पळाला; पेट्रोल पंपावर पैसे बुडवून ड्रायव्हरची धूम pic.twitter.com/BVn0sM7aoV
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2022
संबंधित बातम्या :
CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ
नाशकात ITI चे सहसंचालक 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त
डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला