बुलडाणा : तलाठ्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नारायण पाटीलबा देठे असं आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव आहे. स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. मात्र देठे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ते बुलडाणा तालुक्यातील (Buldana Crime) सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते ते 55 वर्षांचे होते. सकाळी पत्नी त्यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केला. मात्र देठे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
तलाठ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. नारायण पाटीलबा देठे यांनी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नारायण पाटीलबा देठे बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते ते 55 वर्षांचे होते. मात्र देठे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
सकाळी पत्नी त्यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर देठेंचा मृतदेह झाडावरुन उतरवून पंचनामा करण्यात आला.
संबंधित बातम्या :
नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल
एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह, आत्महत्या की घातपात? अमरावतीत खळबळ
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या