गडचिरोली : प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या नवजात बाळाला कुमारी मातेने विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत उघडकीस आली आहे. विहिरीत फेकलेले हे बाळ मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात वाकडी गावात हा प्रकार घडला. एका कुमारी मातेने प्रेमप्रकरणात जन्मलेल्या नवजात अर्भकाला शासकीय विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वाकडी गावातील काही मुलं सार्वजनिक विहिरीच्या आवारात खेळत होती. यावेळी मुलाना विहिरीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं.
गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन, कुरखेडाला माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी नवजात बालक मृतावस्थेत आढळले. बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तपास सुरु करण्यात आला.
कुमारी मातेला अटक
गावातल्या एका कुमारी मातेने त्या नवजात मुलाला प्रेम प्रकरणातून जन्म दिला होता, त्यानंतर त्याला विहिरीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांसमोर आली. आरोपी कुमारी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.
विरारमध्येही अल्पवयीन कुमारी मातेकडून बाळाची हत्या
दुसरीकडे, विरारमध्ये इमारतीतून फेकलेल्या नवजात बाळाच्या मृत्यूचाही उलगडा झाला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने हत्येची कबुली दिली. अल्पवयीन प्रेमी युगुलाच्या शारीरिक संबंधांतून मुलीचा जन्म झाला होता. त्यानंतर अल्पवयीन कुमारी मातेनेच आपल्या पोटच्या बाळाची इमारतीतून खाली फेकून हत्या केल्याचे समोर आले आहे.
16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या शारीरिक सबंधातून बाळाचा जन्म झाला होता. सैल कपडे घालून तिने आपल्या कुटुंबीयांपासून प्रेग्नन्सी लपवली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिने बाथरुममध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतूनच तिने बाळाला खाली फेकलं होतं.
संबंधित बातम्या :
विरारमधील नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा, अल्पवयीन युगुलाच्या संबंधातून जन्मलेले बाळ
रुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या
बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य