गोंदिया : गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेनन यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेआहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदाराचे हार्डवेअर आणि भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेनन यांनी यासाठी 10 हजारांची मागणी केली होती.
एसीबीकडे तक्रार
काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चालान पावती जमा केली होती. मात्र बुधवारी फिर्यादी हे परवाना हस्तांतरणासाठी विचारपूस करायला आले असता, मेनन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली. मात्र तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली.
दहा हजार घेताना रंगेहाथ
त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपी राजेश मेनन यास ताब्यात घेतले आहे.
भिवंडीत काँग्रेस नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात
दुसरीकडे, भिवंडीत अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे जागा आहे .परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात आली होती. परंतु या जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्यात आले होते. सदर गाळे पालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले असता भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे उभारण्यात आले असून याबाबत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महानगरपालिका व महसूल विभागाकडे तक्रार करून सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
इतर बातम्या:
Crime : आधी डोळ्यात मिरची फेकली, नंतर चाकूने केले अनेक वार, तरुणाचा जागीच मृत्यू