गोंदिया : नवविवाहितेने आत्महत्या (Newly Married Lady Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन महिलेने आयुष्याची अखेर केली. विधुर प्राध्यापकाशी जेमतेम चार महिन्यांपूर्वी तिने विवाह केला होता. त्यानंतर तडकाफडकी तिने टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात (Gondia Crime) घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राध्यापकाच्या पहिल्या पत्नीचे कोरोना संसर्गानंतर निधन झाले होते. त्यानंतर दोन मुलांच्या संगोपनासाठी त्याने पुनर्विवाह (Second Marriage) केला. मात्र त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही एकाएकी जीवनयात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील ठाणा येथील नवविवाहित महिलेने आत्महत्या केली. 30 वर्षीय दीपा धर्मेंद्र मेहर यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दीपाचे चार महिन्यांपूर्वी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्याशी लग्न झाले होते. प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांची आधीची पत्नी अंकिताचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
मुलांचे संगोपन करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये धर्मेंद्र यांनी दीपाशी दुसरे लग्न केले. त्यांच्या संसाराला जेमतेम चार महिने झाले होते. असे असताना दीपाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं गूढ मात्र कायम आहे. याबाबत अधिक तपास आमगाव पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
31 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या, गुरांच्या गोठ्यातच आयु्ष्याची अखेर, पत्नी-चिमुरडीचे छत्र हरपले
पती निधनानंतर आर्थिक चणचण, कर्करोगाने त्रस्त महिलेने जीवनयात्रा संपवली
नागपूरची ती, गोंदियाचा तो, आधी आईला कळवलं, मग विशीतील प्रेमी युगुलाची हॉटेलात आत्महत्या