नागपूर : मृत्यूनंतर काय होत असेल, मृत्यूनंतरचं जग (Life after Death) कसं असेल, याचं आकर्षण बऱ्याच जणांना वाटत असतं. मात्र या आकर्षणातून अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला. 13 वर्षीय बलिकेने मृत्यूनंतरच्या जगाच्या आकर्षणातून जीवनाची अखेर (Nagpur Crime) केली. नागपुरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. 13 वर्षीय मुलीने गळफास (Minor Girl Suicide) घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘आय लाईक डेथ’ असं लिहून तिने जीवनयात्रा संपवली. तिच्यावर नेमक्या कुठल्या विचारांचा प्रभाव झाला होता, याचा शोध आता पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
वय तेरा वर्ष, मुलगी अभ्यासात हुशार, खासगी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घ्यायची. मात्र तिच्या डोक्यात वेगळीच दुनिया घर करुन बसली. तिला मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण वाढलं होतं. त्यामुळे ती आईचा मोबाईल घेऊन मृत्यूनंतरच्या दुनियेविषयी माहिती घेत होती.
इंटरनेटवर मिळालेल्या माहितीची नोट आपल्या वहीमध्ये टिपून ठेवायची. कोरोना यावा त्यातून मृत्यू व्हावा, आय लाईक डेथ, डोन्ट लाईक लाईफ, असे विचार तिने लिहून ठेवले होते . त्यामुळे कुठे तरी तिच्या मनात नकारात्मकता घर करत होती.
ती लहान असल्याने त्याकडे कोणी लक्ष केंद्रित केलं नाही. मात्र त्याचा परिणाम पुढे आला. सोमवारी सकाळी वडील ड्युटीवर गेले, भाऊ बाहेर गेला, आई घरात आपल्या कामात होती, त्याच वेळी तिने आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं.
लहान मूल नेमकं काय पाहतात, काय वाचतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड करून दिलं आहे.
संबंधित बातम्या :
Suicide | रानडुक्कर शिकार प्रकरणात रंगेहाथ अटक, आरोपीची शेतात आत्महत्या
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या