नागपूर : ‘परम का ढाबा’ (Param ka Dhaba) या नागपुरातील (Nagpur Suicide) प्रसिद्ध हॉटेलच्या संचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोनी भुपेंद्र राजपूत (Soni Rajput) यांनी कामठी रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. नागपुरातील फूड लव्हर्समध्ये ‘परम की दाल’ प्रसिद्ध आहे. या ढाब्याच्या संचालकाने ऐन तारुण्यात आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनी राजपूत हे 36 वर्षांचे होते. आत्महत्या करताना सोनी घरी एकटेच होते. मुलगा आणि पत्नी पंजाबला गेले असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. सोनी यांचा गळफास लागलेला मृतदेह घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपूरच्या तरुणाईमध्ये त्यांच्या ढाब्यातील ‘परम की दाल’ हे आकर्षणाचं केंद्र आहे.
‘परम का ढाबा’ या नागपूर शहरातील प्रसिद्ध ढाब्याचे संचालक सोनी भुपेंद्र राजपूत यांनी आत्महत्या केली. ते 36 वर्षांचे होते. कामठी रोड येथील राहत्या घरी मंगळवारी सकाळी त्यांनी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचं समोर आलं आहे.
मुलगा आणि पत्नी पंजाबला गेले असल्याने सोनी घरी एकटेच होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नातेवाईकांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
नागपुरातील लकडगंज भागात असलेल्या त्यांच्या हॉटेलमधील ‘परम की दाल’ फूड लव्हर्समध्ये प्रसिद्ध आहे. यूट्यूबवरही त्यांचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Suicide | महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना
नालासोपाऱ्यात तीन वर्षांच्या चिमुरड्यासह पित्याचा लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न