नागपूर : भाड्याने घर घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिला आणि पुरुषाला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलीची या रॅकेटमधून सुटका करण्यात आली. नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या सक्करदारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आशीर्वाद नगर परिसरात आरोपी मोहमद रिजवाण आणि रोशनी हटवार यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी काही अल्पवयीन मुलींना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
अल्पवयीन मुलीची सुटका
सगळी माहिती घेऊन सापळा रचत त्या ठिकाणी आपला बनावट ग्राहक पाठवून धाड टाकत कारवाई करण्यात आली. यावेळी तिथे असलेली महिला आणि तिचा साथीदार यांना ताब्यात घेण्यात आलं तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. अगदी गजबजलेल्या वस्तीत अश्या प्रकारे व्यवसाय सुरु होता, याची माहिती वस्तीत मिळताच नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट
दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
चार पीडित मुलींची सुटका
नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका
अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक
नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले