नागपूर : बॉयफ्रेण्डसोबतचे अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलीने आपल्याच सख्ख्या भावाची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित बॉयफ्रेण्ड आणि अल्पवयीन मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. नागपुरात 12 वर्षीय बालकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती.
काय आहे प्रकरण?
नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुगधामना येथे सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. बारा वर्षीय विजय (नाव बदलले आहे) जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहाव्या वर्गावीत शिकायचा. त्याची आई खासगी काम करते तर वडील माथाडी कामगार आहेत. दोघे कामावर गेले असताना विजय आणि त्याची 17 वर्षीय बहीण घरी होते.
बहिणीचा दावा काय?
दुकानात जात असल्याचं सांगून विजय घराबाहेर पडला. दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला. आपण त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर तो झोपला, असं विजयच्या बहिणीने शेजाऱ्यांना सांगितलं. मात्र शेजाऱ्यांनी पाहिलं असता विजयचा मृत्यू झाला होता.
विजयचा गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या. विजयच्या आई-वडिलांसोबतच पोलिसांनाही कळवण्यात आलं. विजय आरडाओरड करत घरी आला. त्याचा बाहेर गळा आवळण्यात आल्याचा बनाव करुन बहिणीने पोलिसांची दिशाभूल करण्याचे बरेच प्रयत्न केले.
अनैतिक संबंध उघड होण्याची भीती
घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीचा बनाव उघड झाला. अनैतिक संबंधांचा पर्दाफाश होऊ नये म्हणून बहिणीनेच विजयची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी 17 वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर या दोघांची चौकशी करुन रात्री उशिरा अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या :
VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं
धारदार शस्त्राने सपासप वार, कोल्हापुरात निर्घृण हत्याकांड, अल्पवयीन मुलांसह सहा जण जेरबंद
VIDEO | वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद