नागपूर : ‘विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी कविता-शायरी लिहिलेला कागद फेकणे’ हा विनयभंगच आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्व निकाल दिला आहे. अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या केसबाबत निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं.
काय आहे प्रकरण?
अकोला जिल्हयात 2011 मध्ये घडलेल्या घटनेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी झाली. 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करुन तिला धमक्या दिल्याचा आरोप एका 54 वर्षीय पुरुषावर होता. पीडित महिला ही विवाहित असून तिला एक मुलगा आहे. आरोपीने या पीडित महिलेला एक प्रेम पत्र दिलं होतं, पीडितेने हे लव्ह लेटर घेण्यास नकार दिला.
विवाहितेच्या नकारानंतर आरोपीने ही चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हटल्याचा आरोप होता. या प्रकरणात एखाद्या 45 वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे, असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवणाऱ्या दीराला कारावास
याआधी, वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवणं दिल्लीकर दीराला चांगलंच महागात पडलं होतं. अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून दिल्लीतील कोर्टाने आरोपी तरुणाला तीन वर्षांचा कारावास सुनावला होतं. महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तरुणाने अश्लील हावभाव करुन ‘मधलं बोट’ दाखवल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. तीन वर्षांच्या तुरुंगवासासोबतच तरुणाला कोर्टाने दंडही सुनावला
संबंधित बातम्या :
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक
तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप