शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू

| Updated on: Dec 27, 2021 | 8:01 AM

वर्ध्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रोहणा भागात शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बाईकवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला.

शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू
वर्ध्यात बापलेकाचा अपघाती मृत्यू
Follow us on

वर्धा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईकस्वार बापलेक गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातून घरी येत असताना दोघांवर काळाने घाला घातला. हा अपघात वर्धा जिल्ह्यातील रोहणा-पिंपळखुटा मार्गावर रविवारी झाला.

पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रोहणा भागात शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बाईकवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

विजय गाणार (वय 54 वर्ष) आणि अविष गाणार (वय 30 वर्ष) (दोघेही रा. नेहरु वॉर्ड रोहणा) अशी मयत बापलेकाची नावे आहेत.
विजय आणि अविष हे दोघे शेतात गेले होते. विजय यांनी यंदा शेतात मिरचीची लागवड केली आहे. मिरचा तोडा केल्यावर हे दोघेही सायंकाळी दुचाकीने घरी परत होते.

बाईकला धडक देऊन कारचा पोबारा

यावेळी भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने गाणार पितापुत्राच्या दुचाकीला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

बोलेरो गाडी सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, घटनेच्या वेळी या भागातून एक बोलेरो पिकअप गाडी भरधाव वेगाने जात असल्याचं परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात झाली कैद झाले आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस वाहनाचा शोध घेत असून लवकरच आरोपी अटक करणार असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सर्तकतेमुळे वाचले विवाहितेचे प्राण

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी असा झाला खुलासा

पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले, वर्ध्यातील आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात