वाशिम : वर्ध्यात पुलावरुन कार खाली कोसळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागल्याची घटना (Wardha Medical Students Car Accident) ताजी असतानाच विदर्भात आणखी एक असाच भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून अपघात झाला. या घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम (Washim) जिल्ह्यात दोनद जवळ हा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास कार पुलावरुन खाली पडल्याची माहिती आहे. चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे गाडी पुलावरुन खाली कोसळल्याचं बोललं जात आहे. यात एका प्रवाशाला घटनास्थळीच प्राण गमवावे लागले, तर गंभीर जखमी असलेल्या चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली.
पुलगांव येथील 5 जण कारने समृद्धी महामार्गावरून जात होते. यावेळी दोनद नजीक हा अपघात झाला. कार चालकाला डिव्हायडर न दिसल्यानं कार पुलाखाली कोसळली.
या भीषण अपघातात पुलगांव येथील नानाभाऊ पाटेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अमरावतीच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
नागपुरात ओव्हरटेकचा नाद जीवावर बेतला; गुमगावच्या नवविवाहित दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
‘अति घाई संकटात नेई’, ओव्हरटेक करण्याचा बेशिस्त कारचालकाचा प्रयत्न फसला आणि…
अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू, दोघांचीही शाळा अर्धवट